
Saree Fight Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यामुळे लोकांचे मनोरंजन होते. कधी लोकांच्या जुगाडाचे व्हिडिओ व्हायरल होतात, तर कधी मेट्रो किंवा बसमध्ये जागेवरुन भांडणाऱ्यांचे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर लोक म्हणत आहेत, 'हा आहे खरा क्लेश!' हा व्हिडिओ एका सेल (Sale) दरम्यान शूट केलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये महिलांची मोठी गर्दी दिसत आहे, ज्यामुळे हा साड्यांचा किंवा महिलांच्या कपड्यांचा सेल असावा, असा अंदाज लावला जात आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अनेक महिला एका टेबलाभोवती उभे राहून साड्या किंवा कपडे पाहत आहेत. याचवेळी अचानक मागच्या बाजूने आरडाओरडा सुरु होतो. कॅमेरा त्या दिशेने वळल्यावर दिसते की, दोन महिला (Womens) एकमेकींना मारहाण करत आहेत. दोघीही एकमेकींना ढकलत आहेत, ओढत आहेत आणि मारहाण करत आहेत. व्हिडिओ शेअर करणाऱ्या युजरने दावा केला की, ही लढाई दिवाळी सेलमध्ये एका साडीवरुन झाली आहे. 'ही साडी माझी आहे' या वादातून दोन्ही महिलांमध्ये जोरदार हाणामारी झाली आणि या हाणामारीचा व्हिडिओ तिथे उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीने शूट करुन सोशल मीडियावर अपलोड केला.
'एक्स' या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. हे अकाउंट खासकरुन भांडणाचे आणि वादाचे व्हिडिओ शेअर करण्यासाठी प्रसिद्ध आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून अनेक लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
यूजर्सच्या प्रतिक्रिया:
एका युजरने कमेंट करताना लिहिले, "अशा भांडणाने त्यांच्या घरात वर्षभर क्लेश होत राहील."
दुसऱ्या युजरने लिहिले, "या लोकांचा बसमध्ये, मार्केटमध्ये, घरात... सगळीकडेच क्लेश असतो."
तिसऱ्या युजरने कमेंट केली, "हाच खरा क्लेश आहे!"
दिवाळीच्या (Diwali) निमित्ताने सेलमध्ये वस्तू खरेदी करताना अनेकदा गर्दीचा फायदा घेऊन वस्तू पटकन मिळवण्याची धडपड केली जाते. याच धडपडीतून हा वाद वाढला आणि त्याचे रुपांतर थेट हाणामारीत झाले. या व्हिडिओमुळे 'दिवाळीचा सेल आणि साडीवरुन होणारा महिलांचा संघर्ष' पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.