दिवाळीनंतर उडणार लग्नांचे बार; साईदत्त कामतांचा मजेशीर Video Viral
mhaji bayl goa funny video: गोव्यात दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला असताना, साईदत्त कामत या कलाकाराचा एक विनोदी व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. साईदत्त कामत यांनी दैनिक गोमंतक सोबत कॉलॅबोरेशनमध्ये केलेल्या या व्हिडीओमध्ये आपल्या अभिनय आणि आवाजाच्या जोरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यात दिवाळीच्या निमित्ताने एक काल्पनिक व्हिडिओ कॉल संवाद घडवून आणलाय.
काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?
हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजन हाच त्याचा उद्देश आहे. व्हिडिओमध्ये साईदत्त कामत यांनी मुख्यमंत्री सावंत आणि पंतप्रधान मोदी यांचा हुबेहूब अभिनय यात करून दाखवलाय. दोघांचा अभिनय करताना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांनी पंतप्रधान मोदींना व्हिडीओ कॉल केल्याचा भास निर्माण केलाय.
या संवादात, पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांना 'म्हजे घर' (Mhaje Ghar Yojana) योजना कशी सुरू आहे, असं विचारतात, ज्यावर मुख्यमंत्री सावंत ही योजना जबरदस्त सुरू असल्याचं सांगत 'म्हजी बायल' योजना मांडतात.
फक्त मनोरंजनासाठी
हा व्हिडिओ केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. सरकारने अशी कोणतीही योजना (म्हजी बायल योजना) सुरू केलेली नाही. साईदत्त कामत हे गोव्यातील एक नामवंत कलाकार असून, ही त्यांच्या कलेची एक झलक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

