West Bengal 
देश

परदेशातून मतदानासाठी गावी आला; शौचास गेला अन् गुरांचा तस्कर समजून BSF ने झाडल्या गोळ्या

तरुण रात्री घराशेजारी शौचास गेला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

West Bengal: शौचालयासाठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. बीएसएफने केलेल्या गोळीबारात तरुणाचा जीव गेला. पश्चिम बंगालच्या कूचबिहारमधील मसीबाडी येथील ही घटना असून, हा तरुण रात्री घराशेजारी शौचास गेला होता. याप्रकरणी बीएसएफवर तरुणाला गोळ्या घालून ठार केल्याचा आरोप केला जात आहे.

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, घटनेबाबत ग्रामस्थांमध्ये बीएसएफविरोधात प्रचंड संताप उसळला असून, कुचलीबारी पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

गौतम बर्मन असे मृत तरुणाचे नाव असून तो फुलकादावरी गावचा रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. हा तरुण परदेशात मोलमजुरी करून आठवडाभरापूर्वी पंचायत निवडणुकीत मतदान करण्यासाठी गावी परतला होता.

मृताच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. तरुणाच्या डोक्यात गोळी लागल्याचे सांगण्यात येत आहे.

बीएसएफने गोळ्या झाडून मृतदेह काटेरी तारांजवळील भागात फेकून दिला. असे मृताचा भाऊ श्यामल रॉय यांनी म्हटले आहे.

तर, गुरांचा तस्कर असल्याच्या संशयावरून तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा बीएसएफचा दावा आहे. गुरांची तस्करी करण्यासाठी तरुणांना रोखले असता बीएसएफवर हल्ला केला. असे बीएसएफने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

WhatsApp Username Feature: व्हॉट्सॲपच्या 'युझरनेम' फिचरने वापरकर्त्यांचा फायदा की सायबर गुन्हेगारांची चांदी?

Goa Politics: राजकारणात 'नव्या' पक्षांचा जुना खेळ

Goa Congress: अमित पाटकर अखेर काँग्रेस भवनात; आवश्यक दस्तऐवज संबंधित पदाधिकाऱ्याकडे सुपूर्द

Durand Cup Football: आशियातील सर्वात जुनी 135 वी 'ड्युरँड कप स्पर्धा' 25 जुलैपासून; पण सलग दुसऱ्या वर्षीही गोव्याचा एकही संघ मैदानात नाही

SCROLL FOR NEXT