पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा (BJP) विजय हा 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) देशाचा मूड दर्शवत असल्याचा दावा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी फेटाळून लावला आहे. (Mamata Banerjee Has Criticized The BJP)
ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'भाजपने दिवास्वप्न पाहणे बंद केले पाहिजे.' यासोबतच ममता बॅनर्जी यांनी यूपीसह विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रभावी विजयावर साशंकता व्यक्त केली आहे. ममता पुढे म्हणाल्या की, 'हा लोकप्रिय जनादेश नसून 'निवडणूक यंत्रणा आणि केंद्रीय दले आणि केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने मिळवलेला विजय आहे.' कोलकातामध्ये पत्रकार परिषदेत ममता म्हणाल्या, 'निवडणूक यंत्रणा आणि केंद्रीय दले आणि एजन्सीचा वापर करुन ते जिंकले आहेत. आणि उड्या मारत आहेत. ते केटल ड्रम वाजवत आहेत. परंतु ते संगीत तयार शकत नाही. त्यासाठी हार्मोनियमची आवश्यकता लागते.'
ममता पुढे म्हणाल्या, ''तुम्ही म्हणाल की, यूपीमध्ये भाजपचा विजय झाला आहे, परंतु जर तुम्ही अचूक गणना केली तर अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या मतांची टक्केवारी वाढली आहे. अखिलेश यादव यांच्या जागा वाढल्या असून भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. ईव्हीएमबाबत सातत्याने तक्रारी पुढे आल्या होत्या. डीएमए (Additional District Magistrate of Varanasi) यांना याबाबत निलंबितही करण्यात आले आहे. अखिलेश यादव यांचा पराभव झाला आहे. अखिलेश यांनी निराश होऊ नये, त्यांनी लोकांमध्ये जाऊन ईव्हीएमच्या फॉरेन्सिक अभ्यासाची मागणी केली पाहिजे. त्यांना लोकप्रिय जनादेश नाही तर यंत्रणांचा जनादेश मिळाला आहे.''
विशेष म्हणजे, यूपी विधानसभेच्या 403 जागांपैकी भाजपने 273 जागा जिंकल्या आहेत. समाजवादी पक्षाच्या खात्यात 125 जागा आल्या आहेत. याचा अर्थ सपापेक्षा भाजपने दुपटीहून अधिक जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे मात्र निवडणुकीत काँग्रेस आणि बहुजन समाज पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत, तर मायावतींच्या बसपाला केवळ एक जागा मिळवता आली आहे. तर इतरांच्या खात्यात दोन जागा आल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.