5 Tiger Cubs Death Karnataka Dainik Gomantak
देश

Karnataka Tiger Death: वाघीणसह 4 बछड्यांचा संशयास्पद मृत्यूने खळबळ! कर्नाटकच्या वनमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Tiger Cubs Death Karnataka: चामराजनगर जिल्ह्यातील हन्नूर तालुक्यातील माले महादेश्वर जंगलामधील मिन्यम वन्यजीव अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रात एक वाघीण आणि तिच्या चार बछड्यांचा अनैसर्गिकरीत्या मृत्यू झाला आहे.

Sameer Panditrao

बंगळूर: चामराजनगर जिल्ह्यातील हन्नूर तालुक्यातील माले महादेश्वर जंगलामधील मिन्यम वन्यजीव अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रात एक वाघीण आणि तिच्या चार बछड्यांचा अनैसर्गिकरीत्या मृत्यू झाला आहे. त्याची चौकशी करण्याचे आदेश वनमंत्री ईश्वर खांड्रे यांनी गुरुवारी दिले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी वाघीण आणि तिच्या चार बछड्यांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल दुःख व्यक्त करताना खांड्रे म्हणाले की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक (पीसीसीएफ) यांच्या नेतृत्वाखालील एक पथक चौकशी करेल.

प्राथमिक माहितीनुसार वाघीण आणि तिच्या बछड्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असावा; परंतु मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. वन विभागाच्या म्हणण्यानुसार, सरकारने या पाच वाघांच्या मृत्यूची गंभीर दखल घेतली आहे.

जर वन कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केला असेल किंवा विजेचा धक्का, विषबाधा इत्यादींमुळे मृत्यू झाला असेल, तर त्यांच्यावर फौजदारी खटला दाखल करण्याचे आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे तसेच तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्र्यांना दिले आहेत.

दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी धोक्यात असलेल्या वाघांच्या संवर्धनासाठी ‘प्रोजेक्ट टायगर’ सुरू केल्यानंतर राज्यातही वाघांच्या संवर्धनासाठी पावले उचलण्यात आली आहेत. कर्नाटक ५६३ वाघांसह देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. व्याघ्र संवर्धनासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यात एकाच दिवसात पाच वाघांचा अनैसर्गिक मृत्यू होणे हे खूप वेदनादायक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT