Congress President Mallikarjun Kharge Dainik Gomantak
देश

Loksabha Election 2024: ‘’तुम्ही गुजरातचे असूनही गांधींना ओळखत नाही, तुम्हाला गोडसे...’’; PM मोदींच्या वक्तव्यावर खर्गेचं टीकास्त्र

Mallikarjun Kharge Criticized PM Modi: पंतप्रधान मोदींनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालं.

Manish Jadhav

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीतील अंतिम टप्प्यातील मतदान उद्या म्हणजेच 1 जून रोजी होत आहे. आतापर्यंत सहा टप्प्यातील मतदान पार पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयीरथ विरोधकांना रोखायचा आहे. तर दुसरीकडे, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला विजयाची हॅट्ट्रिक लगावयाची आहे. लोकसभा निवडणुकीच्या तब्बल दोन महिन्यांच्या कालावधीत पंतप्रधानांनी 200 पेक्षा जास्त रॅली केल्या. याशिवाय, मोदींनी विविध प्रसारमाध्यमांना मुलाखती दिली. यादरम्यान त्यांनी अशी अनेक वक्तव्य केली, ज्यावरुन विरोधकांनी त्यांचा समाचार घेतला. पंतप्रधान मोदींनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालं.

दरम्यान, आता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महात्मा गांधींबाबत केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘पीएम मोदी हे गुजरातचे आहेत. गुजरातमधील एखाद्याला गांधीजींबद्दल माहिती नसेल आणि त्यांचा प्रचारही केला नसेल, तर मी काय बोलू? आरएसएसचे (RSS) स्वंयसेवक असताना तुम्ही तुमची विचारधारा आणि तत्त्वांचा प्रचार केला, पण महात्मा गांधींसाठी तुम्ही काहीही केले नाही.’ गेल्या 23 वर्षांत तुम्ही काय केले, असा सवालही खर्गे यांनी यावेळी उपस्थित केला. खर्गे पुढे म्हणाले की, तुम्ही गोडसे प्रिय आहात, तुम्ही गांधी प्रिय असू शकत नाहीत.

प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, 'महात्मा गांधी महान व्यक्ती होते. या 75 वर्षात सर्व जगाला महात्मा गांधी माहीत करुन देण्याची जबाबदारी आपली नव्हती का? मला सांगायला वाईट वाटते की त्यांच्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. ‘गांधी’ हा चित्रपट आल्यानंतर जगभरात त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली. या वक्तव्याबाबत पंतप्रधान मोदींविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते लुईत कुमार बर्मन यांनी गुवाहाटी येथील हाटीगांव पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली असून, मोदींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral News Fact Check: मुबलक जांभळे म्हणजे 'दुष्काळाची चाहूल'? सोशल मीडियावर मेसेज होतोय व्हायरल, तज्ज्ञांनी दिलं स्पष्टीकरण

Egg Price Hike: 'ब्रॉयलर' अंडी खाऊ लागली भाव; 90 रुपये डझनने विक्री, 5 महिन्यांनंतर दरवाढ; उकाड्याचा परिणाम

Shreyanka Patil: हवेत चित्त्यासारखी झेप अन् चेंडूवर पकड... श्रेयंकाच्या 'सुपरमॅन' कॅचनं सोशल मीडियावर लावली आग Watch Video

Football Ground Inauguration: माडेल येथे महात्मा गांधी फुटबॉल मैदानाचे उद्‍घाटन, आमदार विजय सरदेसाई यांची उपस्थिती

US Iran Peace Deal: "द डील इज कम्प्लीट!" अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक शांतता करार; 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये होणार अधिकृत स्वाक्षरी

SCROLL FOR NEXT