Loksabha Election 2024: ‘’4 जून रोजी भरपूर पाणी सोबत ठेवा’’; प्रशांत किशोर यांचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; भाजपच्या विजयाचा केला दावा

Prashant Kishor: निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या एका दाव्याची सर्वाधिक चर्चा होत आहे. सोशल मीडियावर या दाव्यासंबंधी चांगलीच चर्चा रंगली आहे.
Prashant Kishor
Prashant KishorDainik Gomantak
Published on
Updated on

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत पाच टप्प्यातील मतदान पार पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विजयीरथ रोखण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. कसल्याही परिस्थितीत मोदींना तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या एका दाव्याची सर्वाधिक चर्चा होत आहे. सोशल मीडियावर या दाव्यासंबंधी चांगलीच चर्चा रंगली आहे. प्रशांत किशोर यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करु शकतो असे म्हटल्याने चर्चांना उधान आले.

दरम्यान, किशोर यांनी दिलेल्या मुलाखतीत भाजपच्या 2019 मधील विजयासारखा दावा केला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जितक्या जागा जिंकल्या होत्या त्याच्या आसपासच या निवडणुकीत भाजप जागा जिंकेल असे म्हटले आहे. याशिवाय, पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास त्यांच्या प्राधान्यक्रमाचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला होता.

Prashant Kishor
Loksabha Election 2024: ‘’स्मृती इराणींचा पराभव नक्की, निवडणुकीनंतर अमेठीहून गोव्यात पाठवणार’’; काँग्रेस नेत्याचा हल्लाबोल

यातच, किशोर यांनी X वर ट्वीट करत म्हटले की, ‘4 जून रोजी भरपूर पाणी प्या....’ पाणी पिण्याचा सल्ला देऊन त्यांनी आपल्या टीकाकारांचा समाचार घेतला. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत.

किशोर यांनी ट्वीटमध्ये पुढे लिहिले की, “पाणी पिणे चांगले असते, कारण ते मन आणि शरीर दोन्ही हायड्रेट ठेवते. या निवडणुकीच्या निकालाचे माझे मूल्यांकन पाहून ज्यांना आश्चर्य वाटते त्यांनी 4 जून रोजी भरपूर पाणी प्यावे.’’

2021 मध्ये झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि त्यापूर्वी त्यांनी केलेले भाकीत लक्षात ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वी किशोर म्हणाले होते की, ‘बंगालमध्ये भाजप तिहेरी आकडा गाठणार नाही. त्यावेळी, अनेक प्रसार माध्यमांनी भाजपच्या विजयाचे भाकीत केले होते.’ तथापि, किशोर यांच्या दाव्यानुसार निकाल आले होते.

Prashant Kishor
Rahul Gandhi: ''जेव्हा सरकार बदलेल, तेव्हा लोकशाही कमजोर करणाऱ्यांना...''; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल

प्रशांत किशोर यांनी नुकतीच एनडीटीव्हीला मुलाखत दिली. या मुलाखतीत ते म्हणाले की, “मला वाटते की मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप पुनरागमन करत आहे. त्यांना गेल्या निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या होत्या तितक्याच जागा या निवडणुकीत मिळू शकतात. भाजप सरकारच्या विरोधात लोकांची निराशा किंवा राग असला तरी मोदी सरकार हटवण्याबाबत फारसा राग नाही.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com