Fly91 Flights Dainik Gomantak
देश

शेतकऱ्यांचं स्वप्न उंच भरारीचं! जळगावच्या मानस कुलकर्णींनी केला 50 वेळा विमानप्रवास

Manas Kulkarni aviation journey: जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक गावातील प्रगतशील शेतकरी मानस कुलकर्णी यांनी या दोघांची सुरेख सांगड घातली आहे.

Manish Jadhav

“शेती आणि विमानप्रवास” ही दोन टोकाची क्षेत्रं वाटू शकतात, पण जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील विवरे बुद्रूक गावातील प्रगतशील शेतकरी मानस कुलकर्णी यांनी या दोघांची सुरेख सांगड घातली आहे. त्यांनी नुकताच या विमान कंपनीसोबत आपला 50वा प्रवास पूर्ण केला आणि त्यानिमित्ताने जळगाव विमानतळावर त्यांचा विशेष सत्कारही करण्यात आला.

कुलकर्णी काय म्हणाले?

दरम्यान, विमानाने जळगाव-पुणे प्रवास सुमारे 1 तास 15 मिनीटांचा आहे. कुलकर्णी यांनी 50 वेळा हा प्रवास केला. कुलकर्णी यांनी जळगावहून पुण्याचा विमान प्रवास आपल्या बायको-मुलासाठी केला. त्यांचा पुण्याशी तसा वैयक्तिक किंवा व्यवसायिक संबंध नव्हता. त्यांची बायको आणि मुलगा शिक्षणासाठी 2013 मध्ये पुण्याला गेले. त्यांचा मुलगा आता मेकॅनिकल इंजिनिअर असून जर्मनीला जाणार आहे.

कुलकर्णी गावातील शेती सांभाळून बायको-मुलाला भेटण्यासाठी पुण्याला (Pune) वारंवार जायचे. कुलकर्णी सांगतात, पूर्वी मला जळगावहून पुण्याला जाण्यासाठी 12-13 तास लागायचे पण आता FLY91 मुळे हे अंतर मला अवघ्या 1 तासात पार करता येते.

FLY91 विमान सेवा

दुसरीकडे, भारतातील (India) टिअर 2 आणि टिअर 3 शहरांना हवाई मार्गाने जोडण्यासाठी FLY91 ही विमान सेवा युद्धपातळीवर काम करत आहे. कंपनीने नुकतीच गोवा-सोलापूर विमानसेवा सुरु केली. गोव्यात मुख्यालय असलेली ही प्रादेशिक विमान कंपनी वेगाने आपला विस्तार करत आहे. दरम्यान, उद्योगातील अनुभवी लोकांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या या विमान कंपनीचे देशातील 50 हून अधिक शहारांना हवाई मार्गाने जोडण्याचे उद्दिष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT