Court Dainik Gomantak
देश

Madras High Court: मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, मंदिरात मोबाईल घेवून जाल तर...

Madras High Court: मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने मंदिरांमध्ये मोबाईल फोन नेण्यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमन्तक

Madras High Court: मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने मंदिरांमध्ये मोबाईल फोन नेण्यावर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. तामिळनाडू सरकारला हा आदेश जारी करताना खंडपीठाने 'पावित्र्य राखण्याच्या' मुद्द्याचा हवाला दिला. राज्यातील सर्व मंदिरांमध्ये भाविकांना मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी असावी, असे न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले.

दरम्यान, तिरुवन्नमलाई येथे नुकतेच मंदिरातील (Temple) मूर्तीच्या दर्शनी भागावर सीसीटीव्ही कॅमेरा बसवल्याची घटना समोर आली. याबाबत भाजपने सत्ताधारी पक्ष द्रमुकवर जोरदार निशाणा साधला. द्रमुकला हिंदू देवतांचा अजिबात आदर नाही, असे भाजपने म्हटले.

'डीएमकेला देवी-देवतांचा आदर नाही'

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई म्हणाले की, 'द्रमुकला देवी-देवतांचा आदर नाही. सीसीटीव्ही कॅमेरा मंदिराच्या गाभाऱ्यात बसवण्यात आला. धर्मादाय एन्डॉमेंट्स विभाग नास्तिकांकडून चालवला जात असल्यामुळे हे घडले.'

त्याचवेळी, श्री जगन्नाथ मंदिराच्या गर्भगृहाचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी एका बांगलादेशी व्यक्तीला अटक करण्यात आली. अधिका-याने सांगितले की, 'गुन्हा दखलपात्र नसल्यामुळे, नंतर त्याला स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला.' या मंदिरात कॅमेरा वापरण्यास मनाई आहे, तरीही अशी घटना घडली आहे. बाराव्या शतकातील या मंदिराच्या सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: वाळपईत वाहतूक कोंडी

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

Virat Kohli: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

Goa Opinion: देशाचा असो वा गोव्याचा असो, शेवटी हुकमाचा एक्का हा मतदार असतो..

SCROLL FOR NEXT