Madras High Court: विवाह सोहळ्याशिवाय लग्न केल्यास लग्न नोंदणीला मान्यता नाही!

मद्रास हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय; धर्मानुसार विवाह सोहळा होणे गरजेचे
Madras High Court
Madras High CourtDainik Gomantak

Madras High Court: मद्रास हाय कोर्टाने मॅरेज सर्टिफिकेटबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. विवाह सोहळा झाला नसेल किंवा विवाह सोहळ्याशिवाय करण्यात आलेली लग्न नोंदणी अमान्य मानली जाईल, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

Madras High Court
Bilkis Bano Case: दोषींच्या माफीला आव्हान देणाऱ्या नव्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट घेणार सुनावणी

म्हणजेच लग्नसोहळा झाला नसेल तर लग्न नोंदणी आणि मॅरेज सर्टिफिकेट या दोन्हींना काही अर्थ नसेल. अशी नोंदणी आणि सर्टिफिकेट फेक मानले जाईल.

न्यायालयाने २०१५ मधील एका प्रकरणात सुनावणी करताना हा निर्णय दिला. ही याचिका एका मुस्लिम महिलेने दाखल केली होती. चुलत भावाने खोटे बोलून कॉलेजमधून आणले आणि नंतर आई-वडीलांना मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने लग्न केले. त्यानंतर तो युवक महिलेला घेऊन सब-रजिस्ट्रार कार्यालयात गेला आणि लग्न नोंदणी रजिस्टवर महिलेची सही घेतली.

या प्रकरणी संबंधित महिलेने २०१५ मध्येच याचिका दाखल केली होती. त्यानंतर आता त्यावर निर्णय दिला गेला आहे. चुलत भावाने लग्न करताना एकाही इस्लामी परंपरेचे पालन केलेले नव्हते, असेही त्या महिलेने याचिकेत म्हटले होते.

Madras High Court
Army Helicopter Crashes: अरूणाचल प्रदेशात लष्कराचे 'रूद्र' हेलिकॉप्टर कोसळले

त्यावर न्या. आर. विजयकुमार यांनी म्हटले आहे की, एखाद्या दाम्पत्याला त्यांच्या धर्मातील विवाहाच्या सर्व प्रथा-परंपरांचे पालन करावे लागेल. त्यानंतरच तामिळनाडू मॅरेज रजिस्ट्रेशन अॅक्ट 2009 नुसार लग्न नोंदणी केली जाऊ शकते. जे अधिकारी मॅरेज रजिस्ट्रेशन करतील त्यांनी याची खात्री केली पाहिजे. एखाद्या दाम्पत्याचे लग्न झाले आहे की नाही हे अधिकाऱ्यांनी तपासले पाहिजे. त्यानंतरच ती नोंदणी ग्राह्य मानले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com