High Court Recruitment 2022: मद्रास उच्च न्यायालयात (Madras High Court) एग्जामिनर, रीडर, लिफ्ट ऑपरेटरसह अनेक पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार mhc.tn.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत 22 ऑगस्ट 2022 पर्यंत असणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध जिल्ह्यांतील रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या भरती ( Govt Jobs 2022) प्रक्रियेद्वारे विविध रिक्त पदांच्या एकूण 1412 जागा भरल्या जातील.
रिक्त जागा तपशील
एग्जामिनर – 118 पदे
रीडर – 39 पदे
वरिष्ठ बेलीफ – 302 पदे
कनिष्ठ बेलीफ – 574 पदे
झेरॉक्स ऑपरेटर – 267 पदे
चालक – 59 पदे
प्रोसेस सर्व्हर – 41 पदे
लिफ्ट ऑपरेटर – 9 पदे
प्रोसेस राइटर – 3 पदे
शैक्षणिक पात्रता जाणून घ्या
एग्जामिनर, रीडर, वरिष्ठ बेलीफ आणि कनिष्ठ बेलीफ या पदांसाठी उमेदवारांनी SSLC उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. झेरॉक्स ऑपरेटर पदासाठी, एसएसएलसी उत्तीर्ण, उमेदवारास किमान 6 महिन्यांच्या कालावधीसाठी झेरॉक्स मशीन चालविण्याचा व्यावहारिक अनुभव असावा. अधिक शैक्षणिक पात्रता आणि या भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 32 वर्षे असावे. उच्च वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 वर्षे आणि एससी आणि एसटी प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट आहे.
निवड प्रक्रिया
निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.