Madras High court Dainik Gomantak
देश

"30 मिनिटांच्या नमाजमुळे हानी होणार नाही"; नमाजवर बंदी घालण्यास Madras High Court चा नकार

Ashutosh Masgaunde

Petition to Ban Namaz Dismissed by Madras HC: मदुराई जिल्ह्यातील थिरुप्परकुंद्रम येथे असलेल्या काशी विश्वंथर मंदिराच्या दिशेने नेल्लीथोपू मार्गावर मुस्लिम धर्मिय नमाज अदा करतात. यावर बंदी घालण्यास मद्रास हायकोर्टाने नकार दिला आहे.

न्यायमूर्ती आर सुब्रमण्यम आणि न्यायमूर्ती एल व्हिक्टोरिया गोवारी यांच्या खंडपीठाने, नेल्लीथोपू येथे नमाज अदा करण्यावर अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच आणि हिंदू धार्मियांना आणि धर्मादाय संस्थांना चार आठवड्यांनी याचिका दाखल करण्यास सांगितले.

३० मिनिटे नमाज अदा करण्यात काही नुकसान नाही आणि त्याचा कोणत्याही व्यक्तीवर परिणाम होणार नाही, अशी टिप्पणीही यावेळी न्यायालयाने केली.

अघिला भरत हनुमान सेनेचे राज्य संघटन सचिव रामलिंगम यांनी ही याचिका दाखल केली होती.

रामलिंगम यांनी आपल्या याचिकेत असे म्हटले आहे की, थिरुप्परकुंद्रमच्या काशी विश्वनाथर मंदिरात प्रार्थना करण्यासाठी गेलेले भाविक विश्रांती घेतात तसेच तेथे भोजन करतात. असे असताना, सिकंदर बधुशा दरगाहच्या जमातच्या सदस्यांनी नेल्लीथोप्पू येथे नमाज अदा करण्यास सुरुवात केली.

त्यांनी पुढे असे सादर केले की, जमातचे सदस्य अनेक वर्षांपासून पल्लिवसल (मशीद) येथे नमाज अदा करता. या प्रकारची घटना यापूर्वी कधीही घडली नव्हती. सिकंदर बधुशा दरगाह देखील थिरुप्परकुंद्रम पर्वतावर आहे आणि जवळच प्रार्थना करण्यासाठी इतर मोकळ्या जागा उपलब्ध आहेत.

एपी रामलिंगम, यांनी जनहित याचिकेत म्हटले आहे की, तिरुपरनकुंद्रम मंदिर HR आणि CE विभागाच्या नियंत्रणाखाली आहे.

नेल्लीथोपू येथे नमाज अदा केल्याने परिसरातील अनेक नागरिकांना त्रास आणि अडथळा निर्माण होत होता.

नमाज अदा केल्यानंतर जमतच्या सदस्यांनी अन्न कचरा आणि प्लॅस्टिकने मार्ग प्रदूषित केला जात आहे. असा दावाही याचिकाकर्ते करत आहेत.

थिरुप्परकुंद्रम अरुलमिघु सुब्रमणिया स्वामी थिरुकोइल पर्वत “सिकंदर पर्वत” म्हणून ओळखला जात होता, असा दावा जमातचे सदस्य करत होते.

यामधून जमातचे सदस्य जमिनीवर अतिक्रमण करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा दावा याचिकाकर्त्यांनी केला.

दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर, न्यायालयाने अंतरिम मनाई आदेश देण्यास नकार दिला. आणि त्यांनी याचिका स्थगित केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT