Madras High Court directed Joe Michael Praveen to pay Rs 50 lakh as compensation for posting a defamatory video about trans person Apsara Reddy onYouTube:
मद्रास उच्च न्यायालयाने अलीकडेच YouTuber जो मायकेल प्रवीण यांना सोशल मीडिया आणि YouTube वर राजकारणी आणि ट्रान्स पर्सन अप्सरा रेड्डी यांच्याबद्दल बदनामीकारक कंटेन्ट आणि व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल नुकसानभरपाई म्हणून 50 लाख देण्याचे निर्देश दिले.
एक प्रसिद्ध वक्ता, पत्रकार आणि AIADMK च्या प्रवक्त्या असलेल्या रेड्डी यांनी न्यायालयाला सांगितले होते की, YouTuber जो मायकेल प्रवीणने त्यांच्या विरोधात वारंवार बदनामीकारक पोस्ट केल्या होत्या.
नुकत्याच दिलेल्या आदेशात, न्यायमूर्ती एन सतीश कुमार यांनी रेड्डी यांनी न्यायालयात सादर केलेल्या अशा अनेक व्हिडिओ आणि पोस्ट्सच्या माध्यमातून ते बदनामीकारक असल्याचे नमूद केले. आरोपी प्रवीणने याबाबत सत्यता पडताळून पाहण्याचा कोणताही प्रयत्न न करता ते ऑनलाइन पोस्ट केले.
याचिकाकर्त्या अप्सरा रेड्डी यांनी न्यायालयाला असेही सांगितले होते की, 2017 मध्ये त्या एका प्रसिद्ध मासिकात संपादक म्हणून काम करत असताना प्रवीणने त्यांच्यासोबत एक संयुक्त व्हिडिओ कार्यक्रम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तथापि, जेव्हा रेड्डी यांनी नकार दिला तेव्हा प्रवीण रागावला आणि रेड्डीबद्दल गॉसिपिंग आणि वाईट गोष्टी पसरवू लागला.
रेड्डी यांनी सांगितले की, प्रवीणच्या बदनामीकारक पोस्टमुळे तिला इतरांशी बोलण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेले अनेक शो रद्द करण्यात आले होते.
रेड्डी पुढे म्हणाल्या की, परिणामी त्यांना खूप तणाव आणि मानसिक त्रास सहन करावा लागला आणि नुकसानभरपाई म्हणून प्रवीणकडून 1.25 कोटी रुपयांची मागणी केली.
न्यायालयाने मान्य केले की, प्रवीणच्या पोस्ट आणि व्हिडिओंमुळे रेड्डी यांचे खूप नुकसान आणि बदनामी झाली आहे.
प्रत्येकाला YouTube वर व्हिडिओ पोस्ट करण्याचा अधिकार असला तरी, या प्रक्रियेत इतरांच्या गोपनीयतेवर अतिक्रमण करता येत नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायालयाने असेही नमूद केले की, वादात असलेले बदनामीकारक YouTube व्हिडिओ आता गुगलने (ज्याकडे YouTube आहे) हटवले आहेत. त्यामुळे, रेड्डी यांनी खटल्यामध्ये गुगलला प्रतिललादी केले नव्हते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.