Awni Eldous: पॅलेस्टिनी चिमुरड्याचं मृत्यूनंतर झालं स्वप्न पूर्ण, Youtuber बनण्याची होती इच्छा

Awni Eldous Gaza: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. गाझामध्ये हमासविरुद्ध इस्रायलची लष्करी कारवाई सुरुच आहे.
Awni Eldous
Awni EldousDainik Gimantak
Published on
Updated on

Awni Eldous Gaza: इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. गाझामध्ये हमासविरुद्ध इस्रायलची लष्करी कारवाई सुरुच आहे. दरम्यान, ऑगस्ट 2022 मध्ये एका पॅलेस्टिनी मुलाने YouTube वर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हातात मायक्रोफोन घेऊन हसत हसत या मुलाने व्हिडिओमध्ये त्याच्या यूट्यूब गेमिंग चॅनलबद्दल सांगितले होते. अवनी अल्दोस नावाचा हा 13 वर्षांचा चिमुरडा गाझा येथील रहिवासी होता. व्हिडिओमध्ये त्याने आपल्या चॅनेलवर 10 लाख सबस्क्राइबर्स मिळवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी त्याच्या चॅनलवर सुमारे 1000 सबस्क्राइबर्स होते.

दरम्यान, त्याचे स्वप्न नक्कीच पूर्ण झाले पण त्याच्या मृत्यूनंतर. सुमारे वर्षभरानंतर इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु झालेल्या युद्धात अवनीला आपला जीव गमवावा लागला. आता याच व्हिडिओला अवनीचे लाखो व्ह्यूज आहेत. त्याच्या चॅनेलवरील सबस्क्राइबर्सची संख्या आता सुमारे 15 लाखांवर पोहोचली आहे आणि सतत वाढत आहे. अवनीचे नाव आणि यूट्यूब चॅनल आता गाझा पट्टीत मारल्या गेलेल्या मुलांसाठी एक प्रकारचे प्रतीक बनले आहे.

Awni Eldous
Israel-Hamas War: ''युद्ध आता महागात पडू लागले'' ; गाझामध्ये मारले जातायेत इस्रायली सैनिक

7 ऑक्टोबरला अवनीच्या घरावर दोन बॉम्ब पडले होते

मिळालेल्या माहितीनुसार, अवनीच्या घराला 7 ऑक्टोबर रोजी इस्रायली हल्ल्याचा फटका बसला होता. याच्या काही तासांपूर्वी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या हद्दीत घुसून सुमारे 1200 जणांची हत्या केली होती. यावेळी त्यांनी 240 लोकांना बंधकही बनवले होते. हा लढा अजूनही सुरु आहे. दुसरीकडे, युनिसेफ या युनायटेड नेशन्स एजन्सी फॉर युनायटेड नेशन्स एजन्सीने गाझा पट्टीचे वर्णन संपूर्ण जगात मुलांसाठी सर्वात धोकादायक ठिकाण म्हणून केले आहे.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, अवनीचे नातेवाईक सांगतात की, अवनी खूप आनंदी आणि आत्मविश्वासू होता. त्याला कॉम्प्युटरची खूप आवड होती त्यामुळे त्याला घरी 'इंजिनियर अवनी' म्हणत. ते पुढे सांगतात की, हमासच्या हल्ल्याच्या दिवशी, जेव्हा इस्रायलने प्रत्युत्तरादाखल हल्ले करण्यास सुरुवात केली, तेव्हा रात्री 8.20 च्या सुमारास त्याला एका मित्राकडून त्याच्या फोनवर मेसेज आला की अवनीचे घर देखील इस्रायलच्या हल्ल्याच्या घेऱ्यात आले, या हल्ल्यात अवनीसह कुटुंबातील 15 जणांचा मृत्यू झाला.

Awni Eldous
Israel-Hamas War: इस्रायली सैन्याची मोठी कारवाई; हमासला शस्त्रे पुरवणारा तस्कर ठार

दरम्यान, अवनीचे वडील संगणक अभियंता होते आणि तो अनेकदा लॅपटॉप घेऊन वडिलांची नक्कल करत. अवनीचे काका मोहम्मद सांगतात की, घराच्या छतावर अचानक दोन बॉम्ब पडले. आम्ही वरच्या मजल्यावर राहत होतो आणि सुदैवाने माझी पत्नी आणि मी वाचलो. त्यांचं म्हणणं आहे की, आम्हाला याबाबत कोणताही इशारा मिळाला नव्हता, हा बॉम्ब अचानक पडला आणि घर उद्ध्वस्त झालं. इस्रायलने या स्ट्राइकवर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Awni Eldous
Israel-Hamas War: गाझामध्ये इस्रायलचे हल्ले तीव्र, एकाच कुटुंबातील 76 जणांचा मृत्यू!

युट्यूबवर गेम खेळतानाचे व्हिडिओ अपलोड करायचा

अवनीने जून 2020 मध्ये त्याचे यूट्यूब चॅनल सुरु केले होते, यामध्ये तो प्रो इव्होल्यूशन सॉकर, कार रेसिंग गेम ब्लर आणि काउंटर स्ट्राइक खेळतानाचे व्हिडिओ अपलोड करायचा. तो गेमिंगबद्दल उत्साही होता आणि गेमिंगला त्यांचे करियर बनवणाऱ्या YouTubers चे त्याला अप्रूप होते. त्याला त्यांच्यासारखे फॉलोअर्स आणि चाहतेही हवे होते. आता तो या जगात नसला तरी संपूर्ण जगासाठी तो नक्कीच प्रेरणास्त्रोत बनला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com