Ludhiana Kindergarten student brutally beaten for a minor mistake, accused teacher jailed. Dainik Gomantak
देश

Viral Video: संतापजनक! किरकोळ चुकीसाठी बालवाडीतील विद्यार्थ्याला पाय मोडेपर्यंत मारहाण, आरोपी शिक्षक गजाआड

Ashutosh Masgaunde

Ludhiana Kindergarten student brutally beaten for a minor mistake, accused teacher jailed:

पंजाबच्या लुधियानामध्ये एलकेजीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाने दिली क्रूर शिक्षा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपी शिक्षक हा शाळेच्या मुख्याध्यापकाचा मुलगा आहे.

वर्गमित्राला पेन्सिलने मारल्याने शिक्षकाने दुसऱ्या वर्गातील दोन मुलांना बोलावले आणि एका मुलाला त्याचा हात आणि दुसऱ्याला पाय धरण्यास सांगितले. यानंतर एलकेजीच्या विद्यार्थ्याला पायावर काठीने मारहाण करण्यात आली. एवढेच नाही तर त्याने मुलाला गळा दाबून ढकलले.

दुसऱ्या दिवशीही मुलाला अशीच शिक्षा देण्यात आली. यावेळी शाळेतील इतर मुलांनी त्याचा व्हिडिओ (Viral Video) बनवून व्हायरल केला. मुलाने घरच्यांना काहीही सांगितले नव्हते पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली.

कुटुंबीयांनी मुलाला रुग्णालयात नेले आणि मोतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बाल विकास मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक राम इक्बाल सिंग यांचा मुलगा भगवान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पालक काय म्हणाले?

मुलाच्या आईच्या म्हणण्यानुसार, वर्गामध्ये त्यांच्या मुलाचे दुसऱ्या एकाशी भांडण झाले. त्यावेळी त्याने पेन्सिल मारली.

मुलाने शिक्षकाकडे तक्रार केली. तेव्हा शिक्षकाने समजावून सांगण्याऐवजी मुलाला क्रूर शिक्षा दिली. मुलगा घरी आल्यावर त्याला चालताही येत नव्हतं पण शाळेत काय झालं ते सांगितलं नाही. मुलाच्या पायाला सूज आली होती आणि पायावर काठीच्या खुणा होत्या.

या घटनेची दखल घेत पोलिसांनी शिक्षकावर कारवाई करत त्याला अटक केली आहे.

आरोपी शिक्षकाचे बाजू

आरोपी शिक्षक भगवान म्हणाले की, मुलाने दुसऱ्या मुलाला पेन्सिलने मारली होती. त्या मुलाचे कुटुंबीय त्यांच्याकडे तक्रार घेऊन आले होते.

या विद्यार्थ्याला अनेकदा समजावून सांगितले. जर एखाद्या पेन्सिलने मुलाच्या संवेदनशील भागाला लागली तर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.

या मुलाच्या कुटूंबियांनी स्वत:हून तो जास्त खोडसाळपणा करतो अशा तक्रारी केल्या आहेत. विद्यार्थी जमिनीवर पडल्यावर त्याला घाबरवण्यासाठी दोन मुलांकडून त्याला पकडलं आणि घाबरवण्याचा प्रयत्न केला.

चाइल्ड केअर प्रोटेक्शनकडून दखल

चाइल्ड केअर प्रोटेक्शन कमिटीच्या सदस्या रश्मी यांनी विद्यार्थ्याच्या घरी भेट दिली. त्यांनी मुलाच्या पालकांकडून घटनेची माहिती घेतली. मुलाचीही भेट घेतली.

रश्मी यांनी सांगितले की, त्या या घटनेबाबत मोती नगर पोलिस स्टेशनला भेटणार आहे. चाइल्ड केअर प्रोटेक्शन कमिटी कुटुंबाला आवश्यक आधार देईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT