LPG Price Hike November 2026 Dainik Gomantak
देश

LPG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री! गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ, दिवाळीपूर्वीच महागाईचा मोठा झटका

LPG Price Hike November 2026: दिवाळीचा सण जवळ येत असतानाच सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना महागाईचा छोटासा झटका बसला आहे.

Sameer Amunekar

दिवाळीचा सण जवळ येत असतानाच सर्वसामान्य नागरिक आणि व्यावसायिकांना महागाईचा छोटासा झटका बसला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आला आहे. देशभरात १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १० ते ११.५० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

मात्र, घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या घरातील स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅसचे दर स्थिर आहेत. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि अहमदाबाद या प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक गॅसचे नवीन दर किती झाले आहेत, जाणून घेऊया.

दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर २,८२० रुपयांवर

देशाची राजधानी दिल्लीमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात हा सिलिंडर २,८१० रुपयांना मिळत होता. आता त्याची किंमत वाढून २,८२० रुपये झाली आहे.

विशेष म्हणजे, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाही व्यावसायिक गॅसच्या दरात मोठी वाढ करण्यात आली होती. त्यावेळी दिल्लीमध्ये सिलिंडरच्या किमतीत ६२.५० रुपयांची वाढ झाली होती. आता नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी पुन्हा दर वाढल्याने व्यावसायिकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

चेन्नईमध्ये सर्वाधिक दरवाढ

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात चेन्नईमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. याठिकाणी १९ किलोच्या सिलिंडरची किंमत आधी २,९८३ रुपये होती. आता त्यात ११.५० रुपयांची वाढ होऊन नवीन दर २,९९४.५० रुपये झाला आहे.

दुसरीकडे, चेन्नईमध्ये घरगुती वापराच्या १४.२ किलोच्या सिलिंडरची किंमत ९५७.५० रुपये कायम ठेवण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना दरवाढीचा फटका बसणार असला, तरी घरगुती ग्राहकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

मुंबई आणि अहमदाबादमध्ये किती झाले नवीन दर?

मुंबईमध्ये १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत आता २,७६४ रुपये झाली आहे. तर घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर ९४१.५० रुपये इतकाच कायम आहे. त्यामुळे मुंबईतील हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना आता गॅससाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

अहमदाबादमध्येही व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला आहे. यापूर्वी २,८३१.५० रुपये असलेली किंमत आता वाढून २,८४२ रुपये झाली आहे. म्हणजेच येथे १०.५० रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, घरगुती सिलिंडरचा दर ९४९ रुपये कायम ठेवण्यात आला आहे.

घरगुती गॅस ग्राहकांना दिलासा; व्यावसायिकांवर वाढीचा भार

नोव्हेंबर महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या असल्या, तरी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बदल झालेला नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांना सध्या अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही.

मात्र, हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये मोठ्या प्रमाणात व्यावसायिक सिलिंडरचा वापर केला जातो. अशा व्यवसायांचा इंधनावरील खर्च वाढल्याने भविष्यात खाद्यपदार्थांच्या किमतींवरही परिणाम होऊ शकतो. दिवाळीच्या काळात मिठाई, फराळ आणि खाद्यपदार्थांची मागणी वाढत असताना ही दरवाढ व्यावसायिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dhangar ST Status Demand: 23 वर्षांची प्रतीक्षा, आता धनगर समाजाचा सरकारला अल्टिमेटम! 'एसटी' दर्जा न मिळाल्यास 4-5 आमदारांना पाडण्याचा दावा

Goa Politics: काँग्रेसला 'हात' की वेगळी चूल? निवडणुकीबाबत 'आरजी'च्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक

खरी कुजबुज: जो जिता वही सिकंदर!

Rohit Sharma: 2027 वर्ल्डकपसाठी 'हिटमॅन'ची खास रणनीती! विजय हजारे ट्रॉफीत मुंबईकडून खेळणार, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पुन्हा गाजवणार मैदान

Crime News: फुटबॉल खेळताना मुलांच्या दोन गटांत वाद; अल्पवयीनावर कुत्रा सोडून दांडक्याने मारहाण, आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT