Love Jihad Dainik Gomantak
देश

Love Jihad: प्रेमाच्या जाळ्यात अडकवून घाणेरडे व्हिडिओ बनवायचा, नंतर ब्लॅकमेल करुन...

Ghaziabad: दिल्ली एनसीआरमध्ये विशेषतः गाझियाबादमध्ये धर्मांतराची प्रकरणे थांबण्याचे नाव घेत नाहीत.

Manish Jadhav

Love Jihad: दिल्ली एनसीआरमध्ये विशेषतः गाझियाबादमध्ये धर्मांतराची प्रकरणे थांबण्याचे नाव घेत नाहीत. गाझियाबादच्या खोडा येथे पुन्हा एकदा लव्ह जिहाद आणि धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे.

आरोपी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवत असे आणि नंतर तेच व्हिडिओ दाखवून त्यांना ब्लॅकमेल करुन धर्मांतर करण्यास भाग पाडत असल्याचे समोर आले आहे.

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खोडा पोलीस ठाण्यात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोडा येथे राहणाऱ्या एका मुलीचे आरोपीने धर्मांतर केले आहे. यानंतर या मुलीने गुपचूप आपल्या घरात नमाज अदा करण्यास सुरुवात केली होती. नातेवाइकांनी तिला पाहिले असता त्यांना संशय आला.

चौकशी केली असता कळले की, मुलीचे धर्मांतर तिच्या कंपनीमधील मॅनजेरनेच केले होते. मॅनेजर स्वतः आधी हिंदू होता आणि त्याने इस्लाम धर्म स्वीकारला असल्याचे समोर आले. यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच पोलिसांनी (Police) कारवाई केली. कंपनीवर छापा टाकून मुख्य आरोपीसह त्याच्या ओळखीच्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आता या संपूर्ण रॅकेटचा तपास सुरु केला आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले की, ती नोएडा सेक्टर 58 कंपनीत काम करते. या कंपनीचा मॅनेजर मोहम्मद राहिल उर्फ ​​राहुल अग्रवाल याने तिचे ब्रेनवॉश करुन धर्मांतर केले.

पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता तो आय ब्लॉक संगम विहार, दक्षिण दिल्ली येथील रहिवासी असल्याचे समजले. 2017 मध्ये त्याने स्वतः इस्लाम धर्म स्वीकारला होता.

तेव्हापासून तो निष्पाप हिंदू मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून धर्मांतर करायचा. यादरम्यान तो मुलींचे अश्‍लील व्हिडीओ बनवायचा आणि नंतर त्यांना ब्लॅकमेल करुन इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडायचा.

प्रेमाच्या जाळ्यात अडकवले

खोडामधील या पीडित मुलीलाही त्याने अशाच प्रकारे शिकार बनवले आहे. त्याने पोलिसांना सांगितले की, तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर इस्लामचे विधी शिकवले. यासाठी सर्व साहित्य ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आले.

एवढेच नाही तर आरोपी राहिलने या मुलीसोबत ऑनलाइन निकाहही केला आहे. आरोपीने पुढे सांगितले की, याआधी अब्दुल्ला अहमद नावाच्या एका व्यक्तीचे इकरा उर्फ ​​नीरुशी लग्न झाले होते.

मात्र, नीरुला ही गोष्ट खूप नंतर कळली. अब्दुल्ला हा पलवलचा रहिवासी आहे. सध्या तो दारुल उलूम देवबंदजवळ राहतो.

तसेच, अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून बीडीएस करत असताना 2014 मध्ये त्याने मुस्लिम धर्म स्वीकारला होता. यावेळी तो आपल्या दवाखान्यात येणाऱ्या हिंदू मुला-मुलींचे ब्रेनवॉश करुन त्यांना इस्लामच्या मार्गावर ढकलण्याचे काम करतो.

यासाठी तो झाकीर नायकचा व्हिडिओचाही आधार घेतो. या रॅकेटमध्ये मुशीर नावाचा व्यक्ती मदत करतो, असे आरोपीने सांगितले. मुशीर मशिदीत ट्यूशन घेतो आणि तेथील मुलांना फसवण्याचे काम करतो.

2014 पासून धर्मांतराचा खेळ सुरु

दुसरीकडे, 2014 पासून त्यांचा खेळ सुरु असून आतापर्यंत त्यांनी डझनभर लोकांचे धर्मांतर केल्याचे आरोपींनी पोलिस चौकशीत सांगितले. पोलिसांनी आरोपी (Accused) आणि पीडित मुलीच्या व्हॉट्सअॅप चॅटची तपासणी केली असता त्यात काही अश्लील व्हिडिओही आढळून आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व आमिषे दाखवूनही मुलगी इस्लाम स्वीकारण्यास तयार नसताना आरोपी अशा व्हिडिओचा वापर करत असे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींच्या मोबाईल चॅटमध्ये मानवी बॉम्ब बनवण्यापासून ते 72 ह्युरॉनपर्यंतची माहिती देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Opening Ceremony: 55व्या इफ्फीच्या ग्रॅंड ओपनिंग सेरेमनीला दिग्गज लावणार हजेरी; गोव्यात अवतरणार अवघे बॉलिवूड!

Cash For Job Scam: मंत्री गोविंद गावडेंच्या कार्यालयातील माजी कर्मचाऱ्याला 13 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 'दीपराज' करणार गोव्याचं नेतृत्व; सुयश उपकर्णधार!

Goa News: लखनौला जाणारे विमान उड्डाणानंतर 20 मिनिटांनी माघारी परतले, गोंधळाची स्थिती; गोव्यातील ठळक घडामोडी!

CM Pramod Sawant: गोमंतकीयांनो सावधान, भुलथापांना बळी पडू नको; वाढत्या फसवणूकीच्या घटनांवर मुख्यमंत्र्यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT