PM Modi Attack on Rahul Gandhi Dainik Gomantak
देश

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

PM Modi Attack on Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आहे.

Manish Jadhav

PM Modi Attack on Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आहे. तर दुसरीकडे मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा विजयीरथ रोखण्यासाठी विरोधकांनी कंबर कसली आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले. दरम्यान, 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगावमधून काँग्रेसवर तोफ डागली. काँग्रेसनं देशात केवळ तुष्टीकरणाचं राजकारण केल्याचा घणाघात पंतप्रधान मोदींनी केला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर देशातील ''राजे-महाराजांचा'' अपमान केल्याचा आरोप केला. तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी त्यांनी नवाब, निजाम, सुलतान आणि सम्राटांनी केलेल्या अत्याचारांवर एक शब्दही उच्चारला नाही, असे म्हणत मोदींनी राहुल गांधींवर सडकून टीका केली. मोदी म्हणाले की, ''काँग्रेसने तुष्टीकरण आणि व्होट बँक लक्षात घेऊन आपला इतिहास आणि स्वातंत्र्य लढा लिहिला. विशेष म्हणजे, आजही काँग्रेसचे ‘शहजादे’ ते पाप पुढे घेऊन जात आहेत. काँग्रेसच्या शहजाद्यानं नुकतच केलेलं वक्तव्य तुम्ही ऐकले असेलच- ते म्हणतात की भारतातील राजे-महाराजे अत्याचारी होते.''

पंतप्रधान पुढे म्हणाले की, ''त्यांनी (गांधी) राजे-महाराजांवर जनतेच्या आणि गरिबांच्या जमिनी आणि मालमत्ता हडप केल्याचा आरोप केला... काँग्रेसच्या शहजाद्यानं छत्रपती शिवाजी महाराज आणि कित्तूरच्या राणी चेन्नम्मा यांसारख्या महान व्यक्तींचा अपमान केला. त्यांचे प्रशासन आणि देशभक्ती आजही आपल्याला प्रेरणा देते.'' म्हैसूरच्या राजघराण्याच्या योगदानाचे स्मरण करुन मोदी म्हणाले की, 'काँग्रेसच्या शहजाद्यानं जाणूनबुजून व्होट बँकेचं राजकारण आणि तुष्टीकरण लक्षात घेऊन असं वक्तव्य केलं.'

'भारताच्या फाळणीत भूमिका बजावणाऱ्या नवाबाची त्यांना आठवत होत नाही'

म्हैसूरच्या राजघराण्याचा त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आजही देशभरात सन्मान होतो, असे म्हणत मोदी म्हणाले की, ''राजे-महाराजांचा काँग्रेसच्या शहजाद्यानं (Rahul Gandhi) अपमान केला, परंतु तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी नवाब, निजाम, सुलतान आणि सम्राटांनी केलेल्या अत्याचारांवर त्यांनी एक चकार शब्दही उच्चारला नाही. राजांनी अत्याचार केला असा शिक्कामोर्तब करण्याचं काम त्यांनी केलं. मुघल शासक औरंगजेबाचे अत्याचार राहुल गांधींना आठवत नाहीत.'' ते पुढे म्हणाले की, 'त्याने (औरंगजेब) आपली अनेक मंदिरे अपवित्र करुन पाडली. ज्याने आपली धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली, गोहत्या केल्या त्याच्याबद्दल काँग्रेस एक शब्द उच्चारत नाही. भारताच्या फाळणीत ज्या नवाबाची भूमिका होती ते त्यांना आठवत नाहीत.''

म्हैसूरच्या राजघराण्याचा त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आजही देशभरात सन्मान होतो, असे म्हणत मोदी म्हणाले की, ''राजे-महाराजांचा काँग्रेसच्या शहजाद्यानं (Rahul Gandhi) अपमान केला, परंतु तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी नवाब, निजाम, सुलतान आणि सम्राटांनी केलेल्या अत्याचारांवर त्यांनी एक चकार शब्दही उच्चारला नाही. राजांनी अत्याचार केला असा शिक्कामोर्तब करण्याचं काम त्यांनी केलं. मुघल शासक औरंगजेबाचे अत्याचार राहुल गांधींना आठवत नाहीत.'' ते पुढे म्हणाले की, 'त्याने (औरंगजेब) आपली अनेक मंदिरे अपवित्र करुन पाडली. ज्याने आपली धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली, आया बहिणींची अब्रू लुटली, गोहत्या केल्या त्याच्याबद्दल काँग्रेस एक शब्द उच्चारत नाही. भारताच्या फाळणीत ज्या नवाबाची भूमिका होती ते त्यांना आठवत नाहीत.''बनारस हिंदू विद्यापीठाच्या उभारणीत बनारसच्या राजाचे आणि मंदिरांच्या पुनर्बांधणीत राणी अहिल्याबाई होळकर यांच्या योगदानाची आठवण करुन देत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसची तुष्टीकरणाची विचारधारा देशासमोर आली आहे आणि ती त्यांच्या जाहीरनाम्यातही दिसून आली, असा घणाघातही केला. दरम्यान, आज बेळगाव येथील भारतीय जनता पक्षाच्या जाहीर सभेला पक्षाचे ज्येष्ठ नेते बी.एस. येडियुरप्पा हेही उपस्थित होते. बेळगाव येथील आदिवासी महिलेवर झालेला कथित अत्याचार आणि चिक्कोडी येथील जैन साधूच्या हत्येचा संदर्भ देत मोदींनी कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यापासून संपूर्ण राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा फज्जा उडाल्याचा हल्लाबोल केला.

'नेहासारख्या मुलींच्या जीवाची किंमत नाही'

हुबळी येथे नेहा हिरेमठ या विद्यार्थिनीच्या नुकत्याच झालेल्या हत्येचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी बरसले. मोदी म्हणाले की, ''कुटुंबाने कारवाईची मागणी केली होती परंतु काँग्रेस सरकारने तुष्टीकरणाला प्राधान्य दिले. नेहासारख्या मुलींच्या जिवाची त्यांना किंमत नाही, ते फक्त त्यांच्या (काँग्रेस) व्होट बँकेचा विचार करतात.'

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बंगळुरुमधील कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाने अवघा देश हादरला होता. यावरुनही पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर शरसंधान साधले. सरकारने सुरुवातीला या घटनेचे गांभीर्य लक्षात घेतले नाही. त्याऐवजी त्यांनी हा ''सिलेंडर स्फोट'' असल्याचे म्हटले, असेही मोदी पुढे म्हणाले.

मोदी शेवटी म्हणाले की, ''मतांसाठी काँग्रेस दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या बंदी घातलेल्या देशविरोधी संघटनेची मदत घेत आहे. केवळ वायनाडमध्ये जिंकण्यासाठी ते त्यांच्यापुढे गुडघे टेकत आहेत. भाजपने पीएफआयवर बंदी घातली आणि त्यांच्या लिडरला तुरुंगात धाडले.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT