Lok Sabha Election 2024: देश शरियानुसार चालणार का? काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरुन अमित शाह यांचा हल्लाबोल

Amit Shah Criticized Rahul Gandhi: शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राहुल यांना विचारले की, देश शरिया कायद्यानुसार चालणार का?
Home Minister Amit Shah
Home Minister Amit ShahDainik Gomantak

Amit Shah Criticized Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप (BJP) जीवाचं राण करत आहे. आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. यादरम्यान राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर (Congress Manifesto) भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राहुल यांना विचारले की, देश शरिया कायद्यानुसार चालणार का? नुकताच भाजपने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Former Prime Minister Manmohan Singh) यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भाजपने दावा केला आहे की, देशातील साधनसंपत्तीवर मुस्लिमांचा पहिला हक्क असायला हवा.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना शाह म्हणाले की, ''काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे की, 'आम्ही पर्सनल लॉ ला महत्त्व देऊ.' मला राहुल गांधींना विचारायचे आहे की, जर तुम्ही पर्सनल लॉ पुढे केला तर आता हा देश शरियाच्या आधारावर चालेल का? या देशात तुम्हाला कसलं संविधान हवंय? आम्ही समान नागरी संहिता (यूसीसी) आणू, सर्व पंथ आणि धर्माच्या लोकांसाठी एकच कायदा असेल, असे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्पष्टपणे म्हटले आहे.''

Home Minister Amit Shah
Lok Sabha Election 2024: ''राहुल गांधी अन् ओवेसी लोकशाहीच्या गप्पा मारतात, पण...''; अनुराग ठाकूर यांचा हल्लाबोल

शाह पुढे म्हणाले की, ''सुरक्षित देशासाठी, समृद्ध देशासाठी, गरिबांच्या कल्याणासाठी, अशा पक्षाला मतदान करा, जो आपल्या आश्वासनांवर काम करतो. ...काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर, भारतीय जनता पक्षाकडे लोकांचा कल आणखी वाढला आहे, कारण काँग्रेसने पुन्हा एकदा आपल्या जाहीरनाम्यात तुष्टीकरणाला महत्त्व दिले आहे.''

Home Minister Amit Shah
Lok Sabha Election 2024: 'हा देश आमचा होता आणि आमचाच राहणार', PM मोदींच्या वक्तव्यावर अकबरुद्दीन ओवेसींचा पलटवार

नड्डा यांनीही आरोप केले

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (JP Nadda) यांनी शुक्रवारी आरोप केला की, 'काँग्रेस मुस्लिमांच्या फायद्यासाठी अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांचे अधिकार हिरावून घेऊ इच्छित आहे.' हा विरोधी पक्षाचा छुपा अजेंडा असल्याचेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मतदान सुरु असतानाच त्यांनी व्हिडिओद्वारे निवेदन जारी केले. नड्डा यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या 2006 च्या विधानाचा हवाला दिला, ज्यात त्यांनी म्हटले की देशाच्या संसाधनांवर अल्पसंख्याकांचा, विशेषत: मुस्लिमांचा पहिला हक्क आहे. सिंग यांनी एप्रिल 2009 मध्येही अशीच टिप्पणी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com