Lok Sabha Election 2024: ''राहुल गांधी अन् ओवेसी लोकशाहीच्या गप्पा मारतात, पण...''; अनुराग ठाकूर यांचा हल्लाबोल

BJP Leader Anurag Thakur: आगामी लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आपली सर्व शक्ती पणाला लावत आहे.
BJP Leader Anura Thakur Criticized Rahul Gandhi Asaduddin Owaisi
BJP Leader Anura Thakur Criticized Rahul Gandhi Asaduddin OwaisiDainik Gomantak
Published on
Updated on

BJP Leader Anura Thakur Criticized Rahul Gandhi Asaduddin Owaisi: आगामी लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आपली सर्व शक्ती पणाला लावत आहे. तर दुसरीकडे, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा विजयीरथ रोखण्याठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी जय्यत तयारी केली आहे. यादरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत.

यातच, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी हे दोघेही औरंगजेबच्या विचारसरणीच्या शाळेत शिकले असल्याचे त्यांनी म्हटले. ते लोकशाहीच्या गप्पा मारतात, पण त्यांच्या हृदयात 'शरिया' कायम आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघात ओवेसी यांच्या विरोधात राहुल गांधींनी उमेदवारी दिल्याने अनुराग ठाकूर यांनी टीकास्त्र डागले.

BJP Leader Anura Thakur Criticized Rahul Gandhi Asaduddin Owaisi
Lok Sabha Election 2024: 'हा देश आमचा होता आणि आमचाच राहणार', PM मोदींच्या वक्तव्यावर अकबरुद्दीन ओवेसींचा पलटवार

राहुल आणि ओवेसी एकाच टीममध्ये आहेत का? असा सवाल ठाकूर यांनी विचारला. राहुल गांधी ओवेसींची 'बी' टीम आहेत की ओवेसी राहुल गांधींची 'बी' टीम आहेत? राहुल गांधी ओवेसींच्या सांप्रदायिक अजेंड्याचे स्टार प्रचारक असल्याचे दिसतात. किमान काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून तरी हे दिसून येते, असेही ते पुढे म्हणाले.

ज्याप्रमाणे राहुल गांधींचा अमेठीत एका महिलेने पराभव केला, त्याचप्रमाणे ओवेसींचाही हैदराबादमध्ये महिलेकडून पराभव होईल, असेही ठाकूर पुढे म्हणाले. तत्पूर्वी, हैदराबादमध्ये भाजप उमेदवाराच्या नामांकन रॅलीत सहभागी होण्यासाठी पोहोचलेले ठाकूर म्हणाले की, 'माधवी लता रिंगणात उतरल्यानंतर ओवेसी सक्रिय दिसत नाहीत.'

ठाकूर पुढे म्हणाले की, ''हैदराबादचे लोक आता ओवेसींच्या राजकारणाला कंटाळले आहेत. त्यांना आता पराभूत करायचे आहे. हैदराबादच्या रस्त्यावर आम्ही भाजप उमेदवाराबाबत लोकांचा उत्साह आणि पाठिंबा पाहिला. खोट्या मतांच्या जोरावर ओवेसींनी अनेकवेळा निवडणुक जिंकली, पण बनावट मतदारांचा जीन आता लवकरच बाटलीत बंद होणार आहे.''

राहुल आणि प्रियंका यांच्यावर हल्लाबोल

'लव्ह जिहाद'मुळे कर्नाटकात त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी मान्य केली नसल्याचा आरोप ठाकूर यांनी यावेळी केला. ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली काँग्रेस आणखी किती मुलींना मारणार आहे, असा सवालही ठाकूर यांनी विचारला.

BJP Leader Anura Thakur Criticized Rahul Gandhi Asaduddin Owaisi
Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाने 75 वर्षांच्या इतिहासात वसूल केला सर्वाधिक अवैध पैसा; मतदानापूर्वीच 4650 कोटी रुपये जप्त

त्यांना सनातन धर्म नष्ट करायचा आहे का?

काँग्रेसवर हल्लाबोल करत केंद्रीय मंत्र्यांनी काँग्रेस पक्षाला सनातन धर्म नष्ट करायचा आहे का, असा सवाल केला. ते म्हणाले की, ''हे लोक राम मंदिर उभारणीच्या विरोधात होते आणि मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रणही नाकारले. हे लोक राम सेतूला काल्पनिक देखील म्हणतात. अशा पक्षाला जनताच उत्तर देईल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com