Calcutta High Court Dainik Gomantak
देश

तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्याचे नाव रवींद्रनाथ टागोर ठेवाल का? सिंहिणीचे नाव 'सीता' ठेवल्याप्रकरणी हायकोर्टाची टिप्पणी

Calcutta High Court: पश्चिम बंगालच्या सफारी पार्कमध्ये दोन सिंहांना अकबर आणि सीता अशी नावे दिल्याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.

Manish Jadhav

Calcutta High Court: पश्चिम बंगालच्या सफारी पार्कमध्ये दोन सिंहांना अकबर आणि सीता अशी नावे दिल्याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. सिंहिणीला सीता मातेचे नाव देण्यावर आक्षेप घेत विश्व हिंदू परिषदेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती सौगता भट्टाचार्य यांनी बंगाल सरकारला दोन्ही सिंहांची नावे बदलण्याचे आदेश दिले, जेणेकरुन वाद संपुष्टात येईल. न्यायमूर्ती म्हणाले की, ''देशातील बहुसंख्य समाज सीता मातेची पूजा करतो. याशिवाय, अकबर हा एक सक्षम, यशस्वी आणि धर्मनिरपेक्ष मुघल शासक होता.''

दरम्यान, बंगाल सरकारने सिंहांना नाव देण्याचा निर्णय त्रिपुरा सरकारचा असल्याचे म्हटले आहे. बंगाल सरकारच्या वकिलांनी सांगितले की, या सिंहांना त्रिपुरामध्ये नावे देण्यात आली होती. यानंतर त्यांना सिलीगुडी येथे आणण्यात आले. मात्र, त्रिपुरात नावे ठेवली असली तरी आता ती बदलायला हवीत, असे न्यायालयाने म्हटले. न्यायमूर्तींनी बंगाल सरकारच्या वकिलाला विचारले की, 'तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्याचे नाव हिंदू देवतेच्या नावावर ठेवणार की मुस्लिम पैगंबरांच्या नावावर? मला वाटतं की आमच्याकडे जर असा अधिकार असता तर आमच्यापैकी कोणीही आमच्या पाळीव प्राण्याचे नाव अकबर किंवा सीता ठेवणार नाही. तुम्ही तुमच्या पाळीव प्राण्याचे नाव रवींद्रनाथ टागोर ठेवू शकता का?'

न्यायमूर्ती पुढे म्हणाले की, 'देशातील बहुसंख्य समाज सीता मातेची पूजा करतो. मी सुद्धा सिंहाला अकबर असे नाव देण्याच्या बाजूने नाही. तुम्ही त्या सिंहाना बिजली किंवा असे काहीतरी नाव देऊ शकता. पण त्यांची नावे सीता आणि अकबरच का ठेवायची? अशा नामकरणामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत विश्व हिंदू परिषदेने याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली. याशिवाय, अशा नामकरणामुळे धर्माच्या अधिकाराचीही पायमल्ली होत आहे. सिंहीणीचे नाव सीता मातेऐवजी दुसरे काहीतरी ठेवावे, अशी मागणी विहिंपने न्यायालयाकडे केली.

बंगाल सरकारला आदेश - सिंहांची नावे त्वरित बदलावी

लाईव्ह लॉच्या वृत्तानुसार, न्यायालयाने बंगाल सरकारला दोन्ही सिंहांची नावे बदलण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी, बुधवारी न्यायालयाने बंगाल सरकारला विचारले होते की या सिंहांची नावे कधी आणि कोणी दिली. यावर बंगाल सरकारच्या वकिलांनी सांगितले की, हे नामकरण त्रिपुरामध्ये झाले असून तेथून त्यांना येथे आणण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT