Lashkar-E-Taiba Testing Drones For Dropping Terrorists: ड्रोनद्वारे दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत उतरवण्याची चाचणी केल्याची माहिती समोर येत आहे. ही चाचणी दहशतवादी गट लष्कर-ए-तोयबाने केली असून चाचणी करण्यात आलेले ड्रोन 70 किलोंपर्यंतचे वजन उचलू शकतात हे आता स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे आता दहशतवादी गट ड्रोनद्वारे दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत उतरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. याबाबतचा व्हिडीओ न्यूज 18 या हिंदी वृत्तसंस्थेकडून प्रसिध्द करण्यात आला आहे.
न्यूज 18 वृत्तसंस्थेने प्रसिध्द केलेल्या व्हिडीओमध्ये असे दिसून येत आहे की, दहशतवाद्यांना एका ड्रोनद्वारे पाण्यात उतरवण्यात येत आहे. दहशतवाद्यांच्या लष्करी कॅम्पमध्ये हा व्हिडीओ चित्रीत करण्यात आला असून दहशतवादी ड्रोनच्या मदतीने माणसाला उचलून पाण्यात टाकताना दिसत आहेत.
"मागिल महिन्यात अशा ड्रोनचा वापर करून पंजाबमध्ये एका दहशतवाद्याला उतरवण्यात आले होते. पंजाब आणि जम्मू-काश्मीरमधील सीमेवर दहशतवाद्यांना उतरवण्याची लष्कर-ए-तोयबाची योजना असल्याचे दिसून येत" असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 या वृत्तसंस्थेला दिली.
सध्या पाकिस्तानमधील दहशतवादी गट आणि ड्रग तस्कर भारतीय हद्दीत प्रामुख्याने पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रे तसेच अंमली पदार्थांची वाहतूक करण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत असेही सूत्रांनी सांगितले.
दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलाचे चार जवान शहीद झाले. या कालावधीत हा व्हिडिओ समोर येत आहे.
“हे ड्रोन अत्यंत कार्यक्षम आहेत. 70 किलोंपर्यंत पेलोड वाहून नेऊ शकतात तसेच सहजपणे 60 किमी प्रवास करू शकतात. त्यामुळे हे ड्रोन मानवी दहशतवादी आणि शस्त्रे सहजपणे वाहून नेऊ शकतात.
पाकिस्तानची गुप्तचर संस्था, ISI च्या पाठिंब्याशिवाय असे ड्रोन दहशतवादी गटांच्या हाती लागणे शक्य नाही. ड्रोनद्वारे दहशतवादी कोणताही मोठा हल्ला करू शकतात आणि परत जाऊ शकतात,” अशी माहिती सूत्रांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.