Lalu Prasad Yadav RSS Dainik Gomantak
देश

Lalu Prasad Yadav On RSS: सर्वात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घाला!

'पीएफआय'वरील बंदीवर प्रतिक्रिया; पीएफआयपेक्षा 'आरएसएस' जास्त धोकादायक संघटना

गोमन्तक डिजिटल टीम

Lalu Prasad On RSS: केंद्रीय गृह मंत्रालयाने (Home ministry) दहशतवादी कारवायात सहभागावरून पॉप्युलर फ्रँट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर पाच वर्षे बंदी घातल्तयावरून राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी याबाबत मत व्यक्त केले आहे. 'पीएफआय'सारख्या संघटनांवर बंदी घालाच, पण सर्वात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घाला, अशी मागणी त्यांनी केली आहे.

'राजद';चे सर्वेसर्वा लालु प्रसाद यादव म्हणाले की, पीएफआय सारख्या संघटनांवर बंदी घातलीच पाहिजे. त्यासोबतच सर्वात आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS)बंदी घातली पाहिजे. ही लोकं मुस्लिम संघटनांना लक्ष्य करतात, प्रत्येक गोष्टीत ते हिंदू-मुस्लीम असा भेदभाव करत असतात. काही संशयास्पद सापडले तर जरूर कारवाई झालीच पाहिजे. पण लोकांसमोर पीएफआयचा बागुलबुवा उभा करू नका.

कारण या सरकारमध्ये दररोज हाच विषय़ असतो. सध्या रोज एकच बाजा वाजतो आहे. हे कसले सरकार आहे? पीएफआय संघटनेची चौकशी सुरू आहे. पीएफआयप्रमाणेच ज्या संघटनांवर बंदी घालायला हवी त्यात आरएसएसचा देखील समावेश आहे. अशा सर्वच संघटनांवर बंदी घातली पाहिजे. आरएसएसवर तर सर्वात आधी बंदी घातली पाहिजे. आरएसएस ही संघठना पीएफआयपेक्षाही धोकादायक आहे.

पीएफआय संघटनेवर बंदी घातल्याबाबतची अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव ज्या बिहारमधून येतात त्याच बिहारची राजधानी पाटणा येथील फुलवारीशरीफ येथून दहशतवादी कारवायांचे एक टेरर मॉड्युल समोर आले होते. भारताला 2047 पर्यंत इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे कारस्थान येथे रचण्यात आल्याचे उघड झाले होते. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी यात लक्ष घालत तपासाची चक्रे फिरवली.

तेव्हापासून आत्तापर्यंतच्या काळात अनेक राज्यांमध्ये छापेमारी झाली आहे, अनेक संशयितांना अटकही करण्यात आली आहे. तसेच 12 जुलै रोजी पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कार्यक्रमात हल्ल्याचा कटही रचण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने पीएफआय (PFI) वर बंदी घातली होती. त्यानंतर आता त्यावर विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan In Goa: गूळ-खोबऱ्याच्या पातोळ्या, तोणियाची भाजी, ब्राह्मीची चटणी; श्रावणातला आहार

Arshdeep Singh: बुमराह-चहलला जमलं नाही, ते अर्शदीप करणार! T20 मध्ये करणार शतक, 'हा' पराक्रम करणारा पहिला गोलंदाज बनेल

Canacona: ..समुद्र राजा आता शांत हो! मच्छीमार महिलांकडून काणकोणात समुद्रपूजन; समुद्रात सोडला नारळ

Goa Athletics: साक्षी, राणी, निकेतचा ‘डबल’ धमाका! राज्य ॲथलेटिकमध्ये पुरुषांत मोझेस, अनंतकृष्णन यांच्यात चढाओढ

Horoscope: सावध राहा! अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे 'या' राशीच्या लोकांना पडेल महागात

SCROLL FOR NEXT