LAHDC Election Result Dainik Gomantak
देश

LAHDC Election Result: कलम 370 हटवल्यानंतर लडाखमधील पहिल्याच निवडणुकीत भाजपला झटका

काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्सचा विजय

Akshay Nirmale

LAHDC Election Result: जम्मू आणि काश्मिरमधून कलम 370 हटवल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत, कारगिलमधील लडाख स्वायत्त हिल कौन्सिलच्या निवडणुकीत (LAHDC- Ladakh Autonomous Hill Development Council) काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स युतीने भाजपचा पराभव केला आहे.

26 जागांच्या लडाख परिषदेच्या निवडणुकीत मतमोजणी सुरू आहे. मात्र, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने भाजपला खूप मागे टाकले आहे. आतापर्यंत जाहीर झालेल्या 22 जागांपैकी काँग्रेसने आठ तर नॅशनल कॉन्फरन्सने 11 जागा जिंकल्या आहेत.

त्याचवेळी भाजपला केवळ 2 जागा मिळाल्या आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवारानेही विजय मिळवला आहे. यानंतर, उपराज्यपाल नंतर मतदानाचा अधिकार असलेल्या चार सदस्यांची नियुक्ती करतील.

मेहबूबा मुफ्ती यांनी आनंद व्यक्त केला

पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की कारगिलमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांना विजय मिळणे ही आनंदाची बाब आहे. सुरवातीच्या कलांनंतर मेहबुबा मुफ्ती यांनी पोस्टमध्ये म्हटले होते की, "नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांना कारगिलमध्ये विजय मिळवताना पाहून आनंद झाला."

कारगिल जिल्ह्यात 65 टक्के मतदान

पाचव्या LAHDC निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीत कारगिल जिल्ह्यात जवळपास 65 टक्के मतदान झाले. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, लडाख प्रशासनाने कारगिल प्रदेशातील पाचव्या LAHDC निवडणुकीसाठी नवीन वेळापत्रक जाहीर केले होते.

ही अधिसूचना अशा वेळी आली आहे जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने आगामी निवडणुकांसाठी नॅशनल कॉन्फरन्सचे पक्ष चिन्ह बहाल करताना केंद्रशासित प्रदेश प्रशासनाची मागील निवडणूक अधिसूचनाही रद्द केली होती.

30 सदस्यीय एलएएचडीसीच्या 26 जागांसाठी 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक झाली. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्सशी हातमिळवणी करून 22 उमेदवार उभे केले. तर एनसी ने 17 उमेदवार मैदानात उतरवले होते.

भाजपने 17 उमेदवार उभे केले होते. गत निवडणुकीत भाजपने एक जागा जिंकली होती आणि नंतर दोन पीडीपी नगरसेवकांच्या समावेशाने त्यांच्या जागांची संख्या तीन झाली. मात्र, यावेळी भाजपने एकूण 17 उमेदवार उभे केले होते. आम आदमी पक्षाने (आप) चार जागांवर नशीब आजमावले, तर 25 अपक्षही रिंगणात होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT