भारतीय वायुसेनेचा पराक्रम सांगणारा व्हिडिओ आनंद महिंद्रांनी केला शेअर, तुम्ही पाहिलाय का?

भारतीय हवाई दल आज 91 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
Air Force
Air ForceDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Air Force: भारतीय हवाई दल आज 91 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. 72 वर्षांनंतर, हवाई दलाच्या उत्कृष्टतेचे दर्शन घडवण्यासाठी नवीन ध्वजाचे अनावरण करण्यात आले आहे.

रविवारी प्रयागराज येथील वार्षिक एअर फोर्स डे च्या परेडमध्ये ध्वजाचे अनावरण करण्यात आले. 8 ऑक्टोबर हा भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. या ऐतिहासिक दिवशी हवाईदल प्रमुख नवीन ध्वजाचे अनावरण करतील," असे भारतीय हवाई दलाकडून सांगण्यात आले होते.

दरम्यान, आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी भारतीय वायुसेनेची ताकद दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय वायुसेनेच्या पराक्रमाची गाथा सांगण्यात आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे.

Air Force
Indian Air Force Day: भारतीय वायुसेनेत 3,000 अग्निवीरांना मिळणार देशसेवेची संधी

महिंद्रा यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, ''जगात सध्या घडत असलेल्या घटनांची नोंद होत आहे. मात्र आपण हवाई दलाच्या जवानांना प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. ते आपल्याला आणि आपल्या कुटुंबांना सुरक्षित ठेवतात. कृतज्ञतेची पैशात गणना केली जाऊ शकत नाही, जय हिंद!”

Air Force
Indian Air Force Day: भारतीय वायुसेनेत 3,000 अग्निवीरांना मिळणार देशसेवेची संधी

दुसरीकडे, एअर फोर्स डे देशभरात भव्य परेडसह साजरा केला जातो. या दिवशी भारतीय हवाई दलातील जवानांना त्यांच्या समर्पित सेवेसाठी सन्मानित केले जाते. एअर फोर्स डे परेड हा हवाई दलाच्या स्थापनेच्या स्मरणार्थ आयोजित केलेला वार्षिक कार्यक्रम आहे.

या परेडमध्ये देशाचे रक्षण करण्यासाठी भारतीय हवाई दलाची (Air Force) क्षमता आणि समर्पण दिसून येते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअर शोमध्ये 120 फायटर, ट्रान्सपोर्ट आणि हेलिकॉप्टर सामील झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com