Kangana Ranaut reaction to KS Alagiri Dainik Gomantak
देश

"कंगना बकवास बोलते, ती आली तर कानाखाली मारा" काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

KS Alagiri controversy: भाजप खासदार कंगना रनौत आणि तामिळनाडूचे काँग्रेस नेते के.एस. अलागिरी यांच्यात एका वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे

Akshata Chhatre

KS Alagiri remark on Kangana Ranaut: बॉलीवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत आणि तामिळनाडूचे काँग्रेस नेते के.एस. अलागिरी यांच्यात एका वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. कंगना यांनी तामिळनाडूत प्रवेश केल्यास, 'तिला कानाखाली मारली पाहिजे,' असे विधान करून अलागिरी यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर कंगनानेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

शेतकऱ्यांच्या वक्तव्यावरून वाद

अलागिरी यांनी आपल्या विधानाची पार्श्वभूमी स्पष्ट करताना म्हटले की, काही शेतकरी त्यांच्याकडे कंगनाच्या जुन्या वक्तव्यांबद्दल तक्रार घेऊन आले होते. अलागिरींच्या म्हणण्यानुसार, कंगनाने एका पत्रकार परिषदेत महिला शेतकऱ्यांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.

'त्या महिलांना १०० रुपये दिले तर त्या कुठेही येऊ शकतात,' असे विधान कंगनाने केल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला. याच गोष्टीला प्रतिसाद देत अलागिरींनी थेट कानाखाली मारण्याचे विधान केले. त्यांनी गेल्या वर्षी चंदीगड विमानतळावर एका महिला पोलीस अधिकाऱ्याने कंगनाला कानाखाली मारलेल्याचाही उल्लेख केला. 'ज्याप्रमाणे विमानतळावर झाले, त्याचप्रमाणे येथील महिलांनीही केले पाहिजे. तरच ती तिची चूक सुधारेल,' असे अलागिरी म्हणाले.

कंगनाचे सडेतोड प्रत्युत्तर

अलागिरी यांच्या विधानावर कंगनाने आपली भूमिका स्पष्ट केली. ती म्हणाली, "आम्ही कुठेही जाऊ शकतो. कोणीही कोणाला रोखू शकत नाही. जर काही लोक माझा द्वेष करत असतील, तर माझ्यावर प्रेम करणारे त्याहून अधिक लोक आहेत. तामिळनाडूच्या जनतेने नेहमीच माझ्यावर प्रेम केले आहे. एका व्यक्तीच्या बोलण्यामुळे काहीही फरक पडणार नाही." या प्रकरणात कंगनाने आपली बाजू ठामपणे मांडली आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये कंगनाला चंदीगड विमानतळावर एका महिला सीआयएसएफ कॉन्स्टेबलने कथितपणे कानाखाली मारली होती. शेतकरी आंदोलनावर कंगनाने केलेल्या टिप्पणीमुळे कॉन्स्टेबलने हे पाऊल उचलल्याचे त्यावेळी समोर आले होते. या घटनेनंतर कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले होते. हाच संदर्भ देत अलागिरी यांनी आता नवा वाद निर्माण केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

World Athletics Championship: नीरज चोप्राचं हुकलं पदक, वॉलकॉटन जिंकलं 'गोल्ड'

Hypoglycemia: काय आहे हाइपोग्लायसेमिया? रक्तातील साखर अचानक कमी होणं ठरु शकतं जीवघेणं; जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे उपाय

SCROLL FOR NEXT