Arrested Dainik Gomantak
देश

West Bengal: हावडामधून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक, ISIS शी संबंध असल्याचा आरोप

Kolkata Police: कोलकाता पोलिसांच्या एसटीएफने हावडा येथून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे.

दैनिक गोमन्तक

Two Terrorist arrested In Howrah: पश्चिम बंगालमधील हावडा येथून मोठी बातमी समोर आली आहे. कोलकाता पोलिसांच्या एसटीएफने हावडा येथून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दोन्ही आरोपींवर ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक एम.टेक.चा विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्यांकडून अनेक संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. एसटीएफचा दावा आहे की, आरोपी जिहादी कारवायांमध्ये सामील आहेत. त्याचबरोबर, ते सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांचे ब्रेनवॉश करायचे. दोन्ही आरोपींना 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलीस लक्ष ठेवून होते

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन्ही आरोपींवर बराच काळ नजर ठेवण्यात आली होती. कोलकाता पोलिस (Police) एसटीएफच्या पथकाने शुक्रवारी (6 जानेवारी) रात्री टिकियापारा येथील आफताबुद्दीन मुन्शी लेन येथून दोघांना ताब्यात घेतले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खिदिरपूरमध्ये गुप्त बैठक आयोजित करणार होते. शस्त्रे गोळा करण्याचाही दोघांचा बेत होता.

दोन्ही आरोपींची ओळख पटली

गुल मोहम्मद सद्दाम, रा. आफताबुद्दीन मुन्सी लेन, टिकियापारा, हावडा असे एका आरोपीचे नाव आहे. तो एम.टेकचे शिक्षण घेत आहे. आरोपीचे वडील रेल्वेतून निवृत्त आहेत. तर सईद हुसेन असे दुसऱ्या आरोपीचे नाव आहे. दोघेही पाकिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांतील दहशतवादी हस्तकांशी थेट संपर्कात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

19 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी

एसटीएफच्या विशेष सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोशल मीडियावर देशद्रोही, कट्टरतावादाला प्रोत्साहन देत होते. तरुणांचे ब्रेनवॉश करुन त्यांना जिहादी कारवायांमध्ये सहभागी करुन घेणे हा मुख्य उद्देश होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक लॅपटॉप, 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. दोन्ही आरोपींना पोलिसांनी बँकशाल न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने (Court) सध्या दोन्ही आरोपींना 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT