West Bengal: नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना झटका, भाजपने जिंकल्या 12 पैकी 11 जागा

West Bengal Chief Minister Mamata Banerjee: यापूर्वी 2021 च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून पराभवाला सामोरे जावे लागले होते.
Mamata Banerjee
Mamata BanerjeeDainik Gomantak
Published on
Updated on

West Bengal Chief Minister Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना झटका देत भाजपने तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदीग्राममध्ये सहकारी नागरी संस्था निवडणुकीत विजय मिळवला आहे. यापूर्वी 2021 च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून पराभवाला सामोरे जावे लागले होते.

दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांचा नंदीग्राम हा मतदारसंघ आहे. एका जिल्हा अधिकाऱ्याने सांगितले की, भेकुटिया सांबे कृषी समितीच्या 12 पैकी 11 जागा भाजपने जिंकल्या आहेत, तर एक जागा तृणमूल काँग्रेसकडे (Trinamool Congress) गेली आहे. ही निवडणूक रविवारी पार पडली. यादरम्यान, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.

Mamata Banerjee
West Bengal मध्ये भाजपच्या निदर्शनाला हिंसक वळण, दगडफेकीला पोलिसांचे चोख प्रत्युत्तर

दुसरीकडे, गेल्या महिन्यात नंदीग्राममध्ये तृणमूलने मोठा विजय मिळवला होता. नंदीग्राम-2 ब्लॉकमध्ये तृणमूलने 51 आणि सीपीएमने एक जागा जिंकली होती, परंतु भाजपला (BJP) एकही जागा मिळाली नव्हती. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या पक्षाने कोंटाई आणि सिंगूरमध्येही मोठा विजय मिळवला आहे.

तसेच, रविवारी झालेल्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकमेकांवर हिंसाचाराचे आरोप केले आहेत. भाजपने तृणमूलवर मतदानात अडथळा आणण्यासाठी बाहेरील लोकांना आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. तर, तृणमूलने शुभेंदू अधिकारी यांच्यावरही हेच आरोप केले आहेत. निवडणुकीत विजयी झालेल्या भाजपच्या एका उमेदवाराने आरोप केला की, तृणमूलने निवडणुकीत अडथळा आणण्यासाठी बाहेरील लोकांना आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे मनसुबे मतदारांनी हाणून पाडले.

Mamata Banerjee
West Bengal: माणुसकीला काळीमा फासणारी घटना, बलात्कारानंतर गरोदर गायीचा मृत्यू

शिवाय, नंदीग्राम हा ममता बॅनर्जी यांचे माजी सहकारी शुभेंदू अधिकारी यांचा मतदारसंघ आहे, ज्यांनी 2021 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूला रामराम ठोकला होता. त्यानंतर बंगाल निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी ते भाजपमध्ये सामील झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com