Kiren Rijiju Car Accident: केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांच्या बुलेट प्रूफ कारचा जम्मू-काश्मीरमधील बनिहालजवळ अपघात झाला आहे. रिजिजू यांच्या कारला साहित्याने भरलेल्या ट्रकची धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. शनिवारी (8 एप्रिल) हा अपघात झाला.
केंद्रीय मंत्री रिजिजू यांच्या गाडीचे अपघातात किरकोळ नुकसान झाले आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
केंद्रीय मंत्री रिजिजू यांच्या गाडीला झालेल्या अपघाताला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. केंद्रीय मंत्री रिजिजू यांच्या कारला जम्मूहून श्रीनगरला रस्त्याने जात असताना किरकोळ अपघात झाला. यात कोणालाही दुखापत झाली नाही आणि मंत्री यांना सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी नेण्यात आले." अशी माहिती रामबन पोलिसांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू शनिवारी कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू विद्यापीठात डोगरी भाषेतील भारतीय संविधानाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी रिजिजू यांना आमंत्रित करण्यात आले होते.
'कायदेशीर सेवा शिबिर'मध्ये सहभागी होण्यासाठी जम्मूहून उधमपूरला जात असल्याची माहिती रिजिजू यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. न्यायाधीश आणि NALSA टीम सोबत केंद्र सरकारच्या योजनांचे अनेक लाभार्थी या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. असे ट्विट त्यांनी केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.