Watch Video: भाजप नेत्याचे महिलांच्या कपड्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले काही महिला असे कपडे घालतात की...

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.
Kailash Vijayvargiya
Kailash Vijayvargiya Dainik Gomantak
Published on
Updated on

Kailash Vijayvargiya: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. विजयवर्गीय यांचा हनुमान जयंतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये कैलाश विजयवर्गीय यांनी महिलांच्या कपड्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

"काही महिला असे कपडे घालून घराबाहेर पडतात की, त्यांना गाडीतून खाली उतरून थोबाडीत मारावी असे वाटते, त्या शूर्पणखेसारख्या दिसतात." असे वक्तव्य विजयवर्गीय यांनी केले आहे.

कैलाश विजयवर्गीय यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कैलास, "आजही मी बाहेर पडताना सुशिक्षित तरुण-तरुणींना नशेत नाचताना पाहतो, कधी कधी नशा उतरवण्यासाठी त्यांच्या थोबाडीत द्यावी असे वाटते. मी खरे सांगतो, देवाची शपथ, हनुमान जयंतीला मी खोटं बोलणार नाही."

"मुलीही असे घाणेरडे कपडे घालून बाहेर पडतात की, आपण स्त्रियांना देवी म्हणतो. पण त्यांच्यात देवीचे रूप दिसत नाही. देवाने खरच छान सुंदर दिलेले शरीर, छान कपडे घाला यार. मला खूप काळजी वाटते." असे विजयवर्गीय व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.

Kailash Vijayvargiya
Goa Corona Update: राज्यात आज नव्या रूग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक, जाणून घ्या ताजी आकडेवारी

एका जाहीर कार्यक्रमात केले वक्तव्य

विजयवर्गीय यांनी बुधवारी रात्री महावीर जयंती आणि हनुमान जयंती संदर्भात एका स्थानिक सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमाच्या मंचावरून भाषण केले. व्हिडिओमध्ये विजयवर्गीय यांनी इंदूरमध्ये रात्रीच्या वेळी तरुण करत असलेल्या दारूच्या नशेबाबत प्रश्न उपस्थित केले. मी आज उपस्थित आजी-आजोबा, पालकांना सांगतो की, शिक्षण नाही तर, संस्कारांची गरज आहेत.

दरम्यान, विजयवर्गीय यांच्या मुलींबाबत केलेल्या शूर्पणखाच्या वक्तव्यावरुन राजकारण सुरु झाले आहे. आता त्यांच्या वक्तव्यावरून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

Kailash Vijayvargiya
Goa Thunderstorm Update: महत्वाची बातमी! सतर्क राहा, गोव्यातील दोन्ही जिल्ह्यात पुढील 3-4 तासांत वादळ, पावसाची शक्यता

कमलनाथ यांनी एका ट्विटमध्ये लिहिले आहे की, असे करताना त्यांनी लिहिले आहे की, मध्य प्रदेशसारख्या देशाच्या मध्यवर्ती भागात भारतीय जनता पक्षाने महिलांचा अपमान आणि छळ करण्याची शपथ घेतली आहे. काल एका भाजप नेत्याने आमच्या मुलींच्या कपड्यांबद्दल अत्यंत लाजिरवाणी टिप्पणी केली आणि त्यांना शूर्पणखा म्हटले.

शिवराज सरकारने जबलपूरमधील दारूच्या दुकानाविरोधात आंदोलन करणाऱ्या बहिणींवर पोलिसांवर क्रूर दडपशाही केली. त्यांना केसांने धरून ओढले. कटनी येथील महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने नातेवाइकांना मृताचे दागिने विकून रुग्णवाहिकेची व्यवस्था करावी लागली. असे आपल्या ट्विटमध्ये कमलनाथ यांनी लिहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com