Kiran Mazumdar-Shaw Success Story Net Worth Dainik Gomantak
देश

Kiran Mazumdar-Shaw: सक्सेसफुल 'किरण'! 10,000 रुपयांवरुन बनवली कोट्यवधींची कंपनी; 2023 मध्ये केले 96 कोटी दान

Kiran Mazumdar-Shaw Success Story Net Worth: आजच्या काळात महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेत आहेत.

Manish Jadhav

Kiran Mazumdar-Shaw Success Story Net Worth: आजच्या काळात महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात गगनभरारी घेत आहेत. महिला आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. आज आपण अशाच एका महिलेबद्दल जाणून घेणार आहोत, जी बंगळुरुमधील सर्वात श्रीमंत महिला आहे आणि जिने अवघ्या 10,000 रुपयांमधून कोट्यवधी रुपयांची कंपनी बनवली आहे. इतकंच नाही तर गेल्या वर्षी तिने 96 कोटी रुपयांची देणगीही दिली होती. किरण मुझुमदार-शॉ असे या उद्योजक महिलेचे नाव आहे.

2023 मध्ये 96 कोटी रुपये दान केले

दरम्यान, किरण मुझुमदार-शॉ (Kiran Mazumdar-Shaw) हे बिजनेस सेक्टरमधील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी जनतेच्या हितासाठीही अनेक कामे केली आहेत. गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेल्या एडलगिव्ह हुरुन इंडिया फिलान्थ्रॉपी लिस्ट 2023 मध्ये त्यांचे नाव दुसऱ्या स्थानावर होते. त्यांनी 2023 मध्ये 96 कोटी रुपयांची देणगी दिली होती, त्यापैकी सर्वाधिक देणगी विज्ञान, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात देण्यात आली होती.

कोण आहेत किरण मुझुमदार-शॉ?

किरण मुझुमदार-शॉ या बायोकॉन लिमिटेडचे ​​संस्थापक आहेत. या कंपनीचे आज बाजार मूल्य 347000000000 (3 ट्रिलियन 47 अब्ज रुपये) आहे. ही बायोफार्मास्युटिकल कंपनी आहे. किरण यांचा जन्म 23 मार्च 1953 रोजी कर्नाटकची राजधानी बंगळुरु (Bangalore) येथे झाला. सध्या त्यांचे वय 70 वर्षे आहे. त्यांच्या वडिलांचे नाव रसेंद्र मजुमदार होते.

किरण मजमुदार-शॉ यांनी कुठे शिक्षण घेतले?

किरण मजमुदार-शॉ यांनी त्यांचे प्रारंभिक शालेय शिक्षण बिशप कॉटन गर्ल्स हायस्कूल, बंगळुरु येथून केले. यानंतर त्यांनी बंगळुरु विद्यापीठाशी संलग्न माउंट कार्मेल कॉलेजमधून शिक्षण घेतले. किरण यांनी 1973 मध्ये बंगळुरु विद्यापीठातून जीवशास्त्र आणि प्राणीशास्त्र विषयातून पदवी प्राप्त केली.

किरण यांना डॉक्टर व्हायचे होते

किरण मजुमदार यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते, पण शिष्यवृत्ती न मिळाल्याने त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले. तथापि, नंतर त्यांनी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठात माल्टिंग आणि ब्रूइंगचा अभ्यास केला आणि 1975 मध्ये मास्टर ब्रूअर पदवी मिळवली.

बायोकॉनची स्थापना कधी झाली?

ऑस्ट्रेलियाहून (Australia) परतल्यानंतर किरण मुझुमदार यांनी 1978 मध्ये बायोकॉनची स्थापना केली. एका छोट्या गॅरेजमध्ये त्यांनी अवघ्या 10,000 रुपयांमध्ये ही कंपनी सुरु केली. कंपनीने पपईपासून पॅपेन एन्झाइम काढण्यापासून सुरुवात केली. हे मांस मुलायम करण्यासाठी वापरले जाते.

याशिवाय बीअर क्लिअरिंगमध्ये वापरण्यात येणारा इन्सिग्लास काढण्याच्या व्यवसायातही त्यांनी नशीब आजमावले. एका वर्षाच्या आत, किरण यांनी मोठे यश मिळवले आणि बायोकॉन अमेरिका आणि युरोपच्या अनेक भागांमध्ये एन्झाइम्स निर्यात करणारी पहिली कंपनी बनली. सध्या किरण यांची एकूण संपत्ती 23247 कोटी रुपये आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

SCROLL FOR NEXT