Why Holi is not celebrated in Kharahari Dainik Gomantak
देश

भारतात 'या' गावांत 150 वर्षांपासून साजरी होत नाही होळी; इथली लोक रंगांना हातही लावत नाहीत, कारण वाचून हैराण व्हाल

Holi 2026: भारत हा सणांचा देश आहे आणि त्यातही होळी म्हटली की डोळ्यांसमोर येतात ते रंग, गुलाल आणि ढोल-ताशांचा गजर.

Sameer Amunekar

Why Holi is not celebrated in Kharahari

भारत हा सणांचा देश आहे आणि त्यातही होळी म्हटली की डोळ्यांसमोर येतात ते रंग, गुलाल आणि ढोल-ताशांचा गजर. फाल्गुन महिना सुरू झाला की संपूर्ण देश रंगात न्हाऊन निघतो. मात्र, उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यात एक असे गाव आहे, जिथे गेल्या दीडशे वर्षांपासून होळीचा सण साजरा केला जात नाही. 'खरहरी' असे या गावाचे नाव असून, येथे ना रंगांची उधळण होते, ना होलिका दहन केले जाते. या परंपरेमागे एक भीतीदायक आणि रहस्यमयी इतिहास दडला आहे.

दीडशे वर्षांपूर्वीची ती भयानक घटना

स्थानिक मान्यतेनुसार, सुमारे १५० वर्षांपूर्वी होळीच्या दिवशी या गावात एक मोठी दुर्घटना घडली होती. होलिका दहनादरम्यान गावात आग लागली. या आगीनं गावातील अनेक घरांना आपल्या विळख्यात घेतले. या आगीत गावाचे प्रचंड नुकसान झाले. त्याच काळात गावातील एका प्रतिष्ठित कुटुंबात अचानक मृत्यूची घटना घडली. या लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आणि त्यांनी या सणाला 'अपशकुन' मानण्यास सुरुवात केली.

ग्रामपंचायतीचा कठोर निर्णय आणि परंपरा

या अनर्थानंतर गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतीने मिळून एक सामूहिक निर्णय घेतला. गावाच्या सीमेच्या आत कधीही होळी साजरी केली जाणार नाही, असा नियम करण्यात आला. तेव्हापासून आजतागायत या गावात होलिका दहनासाठी लाकडे गोळा केली जात नाहीत की रंगांचा खेळ खेळला जात नाही. संपूर्ण देशात जेव्हा रंगांची उधळण सुरू असते, तेव्हा खरहरी गावात मात्र स्मशानशांतता असते.

परंपरा मोडण्याचा प्रयत्न अन् पुन्हा संकट

काही वर्षांपूर्वी गावातील काही तरुणांनी ही जुनी परंपरा मोडून होळी साजरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर गावात अचानक आजारपण आणि महामारी पसरल्याची चर्चा सुरू झाली. या घटनेमुळे गावकऱ्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला की, ही परंपरा मोडणे गावासाठी घातक ठरू शकते. तेव्हापासून आजही नवीन पिढी देखील या नियमाचे काटेकोरपणे पालन करते.

गावाबाहेर साजरी होते होळी

खरहरी गावातील कोणाला होळी खेळायची इच्छा झालीच, तर त्यांना गावाच्या सीमेबाहेर जावे लागते. गावाच्या हद्दीत रंग लावण्यास किंवा जल्लोष करण्यास सक्त मनाई आहे. विशेष म्हणजे, गावातील सर्व जाती-धर्माचे लोक या नियमाचा आदर करतात आणि कोणत्याही वादाविना ही परंपरा पिढ्यानपिढ्या पुढे चालवत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT