Kerala High Court Dainik Gomantak
देश

‘पतीला कुटुंबासोबत आनंद मिळतो...' HC ने डिमेंशिया पीडित पतीला भेटण्याची पत्नीला दिली परवानगी

Kerala High Court: केरळ उच्च न्यायालयाने एका जोडप्याला एकमेकांना भेटण्याची परवानगी दिली आहे.

Manish Jadhav

Kerala High Court: केरळ उच्च न्यायालयाने एका जोडप्याला एकमेकांना भेटण्याची परवानगी दिली आहे. एका 80 वर्षीय महिलेने स्मृतिभ्रंश झालेल्या आपल्या 92 वर्षीय पतीला पुन्हा भेटण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली होती.

महिलेने याचिकेत म्हटले होते की, पती जेव्हा कुटुंबासोबत घरी असतात तेव्हाच आनंदी असतात. त्यांच्या मुलाने त्यांना घरात कैद्याप्रमाणे ठेवले आहे.

स्मृतिभ्रंश झालेल्या व्यक्तीबाबत केरळ उच्च न्यायालयात सुनावणी झाली. महिलेने आपण एका ज्येष्ठ नागरिकाची पत्नी असल्याचा युक्तिवाद केला होता.

दरम्यान, त्यांची काळजी आणि देखभाल करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. या आधारावर उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने 6 ऑक्टोबर रोजी महिलेची (Women) याचिका मान्य केली होती. महिलेने दावा केला होता की, माझ्या मुलाने त्यांना घरात कैद्याप्रमाणे ठेवले होते.

मला पतीला भेटायचे आहे. त्यानंतर आता न्यायमूर्ती देवन रामचंद्रन यांच्या एकल खंडपीठाने या प्रकरणात महिलेला पतीला पुन्हा भेटण्याची परवानगी दिली. दुसरीकडे, अपीलीय न्यायाधिकरणाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिकाही न्यायालयाने यावेळी फेटाळून लावली.

पतीला पत्नीसोबत राहण्याचा पूर्ण अधिकार आहे

आदेशात म्हटले आहे की, 92 वर्षीय व्यक्तीला त्याच्या पत्नीसोबत राहण्याचा अधिकार आहे आणि त्यांना नेय्याट्टिनकारा येथील त्यांच्या घरी नेले पाहिजे. दुसरीकडे, वडिलांना स्मृतिभ्रंश किंवा इतर आजारांनी ग्रासले आहे, असा युक्तिवाद मुलाने केला.

आई वृद्ध आहे आणि ती त्यांची काळजी घेऊ शकत नाही. शेजारीही त्यांना धमक्या देतात. त्यामुळे ते वडिलांना घरात ठेवू शकत नाहीत, असेही मुलाने न्यायालयात सांगितले.

मात्र, न्यायमूर्तींनी निकाल देण्यापूर्वी डीजीपी आणि जिल्हा सामाजिक न्याय अधिकाऱ्यांच्या अहवालांचाही अभ्यास केला. त्यानंतर याचिकाकर्त्यांच्या मागण्यांवर विचार करण्यात आला.

न्यायालयाने म्हटले की, स्मृतिभ्रंश असला तरी ज्येष्ठ नागरिकाला (Senior Citizen) त्याच्या पत्नीसोबत राहून दिलासा मिळतो. दोघेही चांगले क्षण शेअर करतील. पत्नीला तिच्या पतीचे समर्थन करण्याचा आणि त्याची काळजी घेण्याचा अधिकार आहे. मुलगा हे नाकारु शकत नाही. त्यानंतर न्यायालयाने हा निकाल दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT