Kerala High Court: पत्नीची इतर महिलांशी तुलना करणे आणि अपेक्षेप्रमाणे न राहणे यासारखे टोमणे मारणे मानसिक क्रूरता असल्याचे निरीक्षण केरळ हायकोर्टाने नोंदवले आहे. एका व्यक्तीच्या अपिलावर हायकोर्टाने हे निरिक्षण नोंदवले आहे. एक दाम्पत्य सुमारे 13 वर्षांपासून वेगळे राहत होते. फॅमिली कोर्टाने त्यांचे लग्न रद्द करण्याचा आदेश दिला होता. त्या आदेशाला या व्यक्तीने हायकोर्टात आव्हान दिले होते.
लैंगिक संबंध न ठेवण्याच्या कारणावरुन विवाह रद्द केला
दोघांमध्ये कोणतेही शारीरिक संबंध नसल्याच्या कारणावरुन फॅमिली कोर्टाने हा विवाह रद्द केला होता. तर हायकोर्टाने (Hight Court) त्यात सुधारणा करुन घटस्फोट कायदा 1869 अन्वये पतीने मानसिक क्रूरतेच्या आधारे विवाह रद्द केला. खंडपीठाने म्हटले की, "प्रतिवादी/पती वारंवार टोमणे मारत होता. याचिकाकर्ता महिला ही त्याच्या अपेक्षांवर खरी उतरणारी पत्नी नाही. तो तिची इतर महिलांशी (Women) तुलना करायचा. ही निश्चितच मानसिक क्रूरता आहे."
महिनाभरही पती-पत्नी एकत्र राहिले नाहीत
महिनाभरही पती-पत्नी एकत्र राहिले नाहीत
विविध युक्तिवाद, पत्नी आणि तिच्या आईची साक्ष, पतीने महिलेला पाठवलेला ई-मेल यांच्या आधारे हायकोर्टाने हा निकाल दिला. ई-मेलमध्ये पतीने जोडीदाराकडून आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. नातेसंबंधात कसे वागले पाहिजे हे महिलेला सांगितले आहे.
खंडपीठाने पुढे असेही म्हटले की, 'दोघांचे जानेवारी 2009 मध्ये लग्न झाले होते. मात्र ते खूप कमी काळ एकत्र राहिले. नोव्हेंबर 2009 मध्येच त्यांनी लग्न रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली होती.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.