Court Dainik Gomantak
देश

Kerala Court: भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी PFI च्या 15 जणांना फाशीची शिक्षा

Kerala Court: भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी केरळ न्यायालयाने पीएफआयशी संबंधित 15 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Manish Jadhav

Kerala Court: भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी केरळ न्यायालयाने पीएफआयशी संबंधित 15 जणांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. डिसेंबर 2021 मध्ये, अलाप्पुझा जिल्ह्यात भाजप ओबीसी विंगचे नेते रणजीत श्रीनिवासन यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मावेलिक्कारा व्ही.जी. श्रीदेवी यांनी मंगळवारी दोषींना शिक्षा सुनावली. आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. याबाबत पीएफआयचे हे सदस्य 'ट्रेंड किलर स्क्वॉड'शी संबंधित असल्याचे सांगण्यात आले. पीडितेची आई, मूल आणि पत्नी यांच्यासमोर ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली, ते दुर्मिळ गुन्ह्यांच्या श्रेणीत येते, असे वकिलांनी म्हटले होते.

रिपोर्टनुसार, भाजप नेते रणजित श्रीनिवासन यांच्या हत्येत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि 'सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया' (SDPI) शी संबंधित कार्यकर्त्यांचा हात होता. 19 डिसेंबर 2021 रोजी या लोकांनी रणजीत यांना बेदम मारहाण करुन घरातच कुटुंबासमोर त्यांची हत्या केली होती. विशेष वकिलांच्या म्हणण्यानुसार, आरोपींचा उद्देश श्रीनिवासन यांना पळून जाण्यापासून रोखणे आणि त्यांच्या किंकाळ्या ऐकून कोणालाही घरात प्रवेश करण्यापासून रोखणे हा होता.

यापूर्वी, 20 जानेवारी रोजी न्यायालयाने या प्रकरणी सर्व 15 जणांना दोषी ठरवून 30 जानेवारीपर्यंत निकाल पुढे ढकलला होता. विशेष वकिल प्रताप जी पडिक्कल यांच्या म्हणण्यानुसार, 15 आरोपींपैकी 1 ते 8 आरोपी या प्रकरणात थेट सहभागी असल्याचे न्यायालयाला आढळून आले. न्यायालयाने 4 आरोपींना (आरोपी क्रमांक 9 ते 12) हत्येसाठी दोषी ठरवले. कारण ते थेट गुन्ह्यात सहभागी असलेल्या लोकांसोबत होते आणि प्राणघातक शस्त्रांसह घटनास्थळी पोहोचले होते.

दिवंगत नेत्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल: भाजप

न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना श्रीनिवासन यांच्या कुटुंबीयांनी दोषींना जास्तीत जास्त शिक्षा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. भाजपनेही न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत पक्षाच्या दिवंगत नेत्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला, अशी आशा व्यक्त केली आहे. 18 डिसेंबरच्या रात्री, भाजप नेत्याच्या हत्येच्या काही तास आधी, एका टोळीने SDPI नेते के. एस. शान यांची हत्या केली होती. घटनेच्या वेळी ते अलाप्पुझा येथील आपल्या घरी परतत होते. या प्रकरणावरुन बराच गदारोळही झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT