Law Dainik Gomantak
देश

Motor Vehicle Act: अल्पवयीन भावाला गाडी चालवायला देणं पडलं महागात; 34 हजार दंड अन्...

Kerala News: दुचाकीवरून इंडिकेटर किंवा रीअरव्ह्यू मिरर देखील गायब असल्याचा आरोप त्यांनी केला.

Ashutosh Masgaunde

Minor Driving Motorcycle: केरळ न्यायालयाने नुकतीच एका व्यक्तीला 34,000 हजार रुपये दंड आणि न्यायालय उठेपर्यंत साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.

या दोषी व्यक्तीने त्याच्या अल्पवयीन भावाला त्याची मोटारसायकल चालवण्याची परवानगी दिली, तीही वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस नोंदणी क्रमांक नसताना.

एर्नाकुलमच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी नयना के.व्ही. यांनी हा आदेश दिला. तसेच त्यांनी वाहनाची नोंदणी 12 महिन्यांच्या कालावधीसाठी आणि आरोपीचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्याचे निर्देश दिले.

वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस नोंदणी चिन्ह व क्रमांक न लावता अल्पवयीन मुलाने आरोपीच्या संमतीने त्याची मोटारसायकल लालवल्याचा आरोप आहे.

वाहनावर साइड गार्ड, इंडेकेटर किंवा रियर व्ह्यू मिरर बसवलेले नसल्याचा आरोपही करण्यात आला. याप्रकरणी आरोपींनी गुन्हा कबूल केला. यामध्ये आरोपीला कलम २४८ (२) सीआरपीसी अंतर्गत दोषी ठरवण्यात आले.

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन कार्यालय (अंमलबजावणी), कक्कनड यांनी तक्रार केल्यानंतर त्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला.

तक्रारीत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी दावा केला होता की, अल्पवयीन मुलाने त्याच्या मोठ्या भावाच्या परवानगीने 24 एप्रिल रोजी अलुवा ते पट्टेरीपुरमपर्यंत मोटारसायकल चालवली होती.

तक्रारदाराने त्या व्यक्तीवर केंद्रीय मोटार वाहन नियम आणि मोटार वाहन कायदा, 1988 नुसार दंडनीय गुन्ह्यांची नोंद करावी अशी मागणी केली. दुचाकीवरून दिशादर्शक दिवा किंवा रीअरव्ह्यू मिरर देखील गायब असल्याचा आरोप त्यांनी केला.

दंडाधिकार्‍यांनी आदेश देण्‍यापूर्वी, बाईकवर वाहनाच्या पुढील आणि मागे नोंदणीचे चिन्ह नसल्‍याची वस्तुस्थिती विचारात घेतली.

आदेशात न्यायालयाने एका वर्षासाठी वाहन नोंदणी रद्द केली आणि पुढील तीन महिन्यांसाठी त्या व्यक्तीचा ड्रायव्हिंग लायसन्सही रद्द केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT