Tomato आता जीवही घेऊ लागला! आठवड्यात दोन शेतकऱ्यांची हत्या; आंध्र प्रदेशात घडतायेत धक्कादायक घटना

Andhra Pradesh: हा खून कशामुळे झाला याबाबत स्थानिकांमध्ये विविध चर्चा रंगल्या आहेत. त्यातून नवनवीन माहिती पुढे येऊ लागली आहे.
Crime News
Crime News Dainik Gomantak
Published on
Updated on

Andhra Pradesh Crime News: अन्नमय जिल्ह्यात नुकताच आणखी एका टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचा मृत्यू झाला, ही गेल्या सात दिवसांतील जिल्ह्यातील दुसरी घटना आहे.

पोलिसांनी सांगितले की, जिल्ह्यातील पेड्डा तिप्पा समुद्र गावातील शेतकरी बटुला मधुकर रेड्डी (२८) हे सोमवारी मध्यरात्री त्यांच्या शेतात पिकाचे राखण करण्यासाठी झोपले असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांचा भोसकून खून केला.

यानंतर टोमॅटो चोरीच्या प्रयत्ननात हा खून झाल्याची शक्यता स्थानिक व्यक्त करत आहेत. तर काही जणांच्या मते हा खून विवाहबाह्य संबंधातून झाला आहे.

सोमवारी सकाळी त्यांच्या शेतातून जाणाऱ्या स्थानिकांनी त्यांचा मृतदेह जमिनीवर चाकूने वार केलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

त्यांनंतर स्थानिकांनी तत्काळ पोलिसांना तसेच मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनाही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून, या हत्येमागे विवाहबाह्य संबंध असावेत, असा संशय आहे.

Crime News
E-Cigarettes विकणाऱ्या १५ वेबसाइट्सना नोटीस; जाणून घ्या ई-सिगारेट म्हणजे काय आणि त्याचे धोके

स्थानिक डीएसपी केसप्पा म्हणाले की त्यांनी सुगावा गोळा केला आहे आणि लवकरच आरोपींना पकडू. “आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहोत. आम्ही पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहोत,” तो म्हणाला.

Crime News
Operation Trinetra II: जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी केला 4 दहशतवाद्यांचा खात्मा

13 जुलै रोजी त्याच जिल्ह्यातील मदनपल्ले मंडल अंतर्गत बोदुमल्लादीन्ने गावात 62 वर्षीय टोमॅटो उत्पादक शेतकरी नरेम राजशेखर रेड्डी यांची हत्या करण्यात आली होती.

फक्त टोमॅटो उत्पादकांचीच हत्या होत असल्याने यामागे संशय व्यक्त होत आहे. काही स्थानिक नागरिक आणि टोमॅटो उत्पादकांच्या मते, सध्या बाजारात टोमॅटोच्या किंमती वाढत आहेत. त्यामुळे पीकाच्या चोऱ्याही होत आहेत. चारीच्या प्रयत्नातही हा खून झाल्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com