Karnataka Accident Dainik Goamantak
देश

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

Uttar Kannada Road Accident: कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली.

Manish Jadhav

Uttar Kannada Road Accident: कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली. येथे एका ट्रक आणि क्रूझर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. हा अपघात इतका भयानक होता की, क्रूझरचा अक्षरशः चक्काचूर झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हा जीवघेणा अपघात उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापूर तालुक्यातील अराबैल घाटात घडला. बुधवारी (8 जुलै) रात्री धारवाडहून अंकोलाच्या दिशेने एक क्रूझर गाडी एकूण 9 प्रवाशांना घेऊन जात होती. हे सर्वजण धर्मस्थळ आणि चिक्कमंगलूर येथे पर्यटनासाठी निघाले होते. मात्र, रात्रीच्या वेळी त्यांची गाडी अराबैल घाटातील बालगार भागात पोहोचली, तेव्हा समोरुन येणाऱ्या एका वेगवान ट्रकची आणि क्रूझरची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. ही धडक एवढी तीव्र होती की, क्रूझरमधील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या अपघाताबाबत (Accident) समोर आलेली सर्वात वेदनादायक माहिती म्हणजे, अपघातग्रस्त कारमधील सर्व तरुण हे प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनी 'स्विगी' मध्ये पार्ट-टाईम डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत होते. सर्व मित्रांनी मिळून आनंदाने ट्रिपचा प्लॅन केला होता, मात्र प्रवासादरम्यानच त्यांच्यावर काळाने घाला घातला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर मृतांचे पोस्टमार्टम करण्यासाठी मृतदेह येल्लापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले.

याप्रकरणी येल्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. आनंदाच्या ट्रिपचे रुपांतर अशा रीतीने शोकांतिकेत झाल्याने मृत तरुणांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT