Karnataka Road Accident Dainik Gomantak
देश

Karnataka Road Accident: कर्नाटकात भीषण अपघात, ट्रक-बसच्या धडकेत 17 जणांचा मृत्यू; मृतांचा आकडा वाढण्याची भीती VIDEO

Road Accident: कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली.

Sameer Amunekar

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. राष्ट्रीय महामार्ग ४८ वर ट्रक आणि खाजगी ट्रॅव्हल्स यांच्यात झालेल्या भीषण धडकेत १७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अपघाताचा थरार

मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूहून गोकर्णच्या दिशेने जाणारी एक खाजगी स्लीपर कोच बस चित्रदुर्ग जिल्ह्यातील हिरियूर तालुक्यात असलेल्या गोरलाथु क्रॉस जवळ आली असताना हा अपघात झाला.

विरुद्ध दिशेने येणारा एक भरधाव ट्रक अनियंत्रित होऊन दुभाजक ओलांडून बसवर आदळला. ही धडक इतकी भीषण होती की, काही क्षणातच बसने पेट घेतला. बस स्लीपर कोच असल्याने प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, परिणामी अनेक प्रवासी आतच अडकून पडले.

मृतांची ओळख पटवणे कठीण

बसला लागलेली आग इतकी रौद्र होती की संपूर्ण गाडी जळून खाक झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ प्रवाशांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीमुळे बसचा सांगाडा उरला असून मृतांची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

प्राथमिक तपासानुसार, ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. ट्रक चालक गाडी चालवताना झोपला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. चित्रदुर्गचे पोलीस अधीक्षक रणजीत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून हिरियूर ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Municipal Elections: 11 नगरपालिका आणि पणजी महापालिकेसाठी रणधुमाळी! मार्च-एप्रिलमध्ये निवडणुकीचा धमाका

Goa Politics: अमित पालेकरांना 'आप' प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं! "वापरा आणि फेकून द्या" काँग्रेसने लगावला टोला

Margao: विद्युत रोषणाईने मडगाव शहर उजळले, गोमंतकीयांमध्ये नाताळचा उत्साह; बाजारपेठा साहित्याने सजल्या; खरेदीसाठी उडतेय झुंबड

Mahavir Sanctuary: महावीर अभयारण्यात होणार खनिज हाताळणी, वनजमिनीचा वापर करण्यास परवानगी; पर्यावरणवाद्यांना धक्का

Goa Live Updates: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 रोजी गोव्‍यात

SCROLL FOR NEXT