PM Narendra Modi Dainik Gomantak
देश

"मास्क घालणे आवडत नाही, पंतप्रधानांनाही ते आवश्यक वाटत नाही"

कर्नाटकचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार आणि वन विभागाचे मंत्री उमेश कट्टी यांनी मास्क घालण्याबाबत वादग्रस्त विधान केले

दैनिक गोमन्तक

एकीकडे देशात कोरोना संसर्गाच्या (Covid-19) रूग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. तर दुसरीकडे देशातील बड्या नेत्यांची बेजबाबदार वक्तव्ये आणि कृती आणखी त्यात भर टाकून संकट निर्माण करत आहेत. आता कर्नाटकातील (Karnataka) एक मंत्री आणि भाजप नेत्याने मास्क घालण्यास नकार दिला आहे. एका कार्यक्रमात ते मास्क न लावता आले होते. इतकेच नाही तर कर्नाटकचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार आणि वन विभागाचे मंत्री उमेश कट्टी यांना या मुद्द्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी बेजबाबदार विधान केले. ते म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणतात की, मास्क घालणे अनिवार्य नाही. ही वैयक्तिक जबाबदारी आहे. ज्याला मास्क घालायचा आहे तो घालू शकतो. पण मला मास्क घालण्यात रस नाही, म्हणून मी मास्क घातला नाही. हा माझा वैयक्तिक निर्णय आहे." (Karnataka Minister on PM Modi Mask controversy updates)

मास्क घालणे हा वैयक्तिक निर्णय

उमेश कट्टी हे एसआर बोम्बई सरकारमध्ये मंत्री आहेत. बेळगावपासून 140 किमी अंतरावर असलेल्या अथणी येथे ते एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपचे आमदार लक्ष्मण सवदी देखील त्यांच्यासोबत सामील झाले. कार्यक्रमाला संबोधित केल्यानंतर ते बाहेर आले तेव्हा मीडियाने त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावेळीही त्यांनी मास्क घातलेला नव्हता. कट्टी यांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की मास्क घालण्यासाठी कोणावरही निर्बंध लादले जाणार नाहीत. हा प्रश्न लोकांच्या वैयक्तिक निर्णयावर सोडले आहे. मंत्र्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

वादग्रस्त विधानांसाठी ओळखल्या जाते

या प्रसंगानंतर मोठा विरोध आणि टिका प्रतिक्रिया पाहता अखेर मंत्री उमेश कट्टी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, "प्रसारमाध्यमांनी आमचे विधान चुकीचे मांडले आहे. सर्व लोकांनी मास्क पॉलिसीचे नियम पाळले पाहिजेत आणि त्यांची जबाबदारी समजून घेतली पाहिजे. माझे विधान काही वेगळे नव्हते. मास्क घालू नये, असे मी कोणालाही सांगितले नाही. मात्र माझ्या विधानाचा चुकीचा संदर्भ देऊन विपर्यास केला जात आहे. या कोरोना महामारीच्या काळात आपण सर्वांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे."

याआधीही उमेश कट्टी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेकदा चर्चेत आले आहेत. ज्यांच्याकडे टीव्ही आणि मोटारसायकल आहे त्यांनी बीपीएल कार्ड घेऊ नये. या आदेशाचे पालन न केल्यास केल्यास बीपीएल ग्राहक धारकांवर कारवाई करण्यात येईल. या विधानामुळे ते एकदा चर्चेच आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT