आजपासून यूएस विमानतळांवर 5G लागू, एअर इंडियाने अनेक उड्डाणे केली रद्द

5G तंत्रज्ञान फ्लाइटला लँडिंग मोडमध्ये जाण्यापासून रोखू शकते.
Air India
Air IndiaDainik Gomantak
Published on
Updated on

यूएस विमानतळांवर 5G इंटरनेट सेवा पुनर्संचयित केल्यामुळे, यूएसला जाणाऱ्या विमानांना फटका बसू शकतो. या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमुळे भारतीय विमान कंपनी एअर इंडियाच्या उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. एअर इंडियाने (Air India) अमेरिकेला (America) जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. त्याचवेळी एअर इंडियाशिवाय दुबईच्या एमिरेट्स एअरलाइन्सनेही अमेरिकेला जाणारी उड्डाणे रद्द केली आहेत. (Air India Aircraft News In Marathi)

खरं तर, 5G तंत्रज्ञानामुळे, एअरलाइन कंपनी एअर इंडियाने 19 जानेवारीपासून म्हणजेच आजपासून भारतातून अमेरिकेला उड्डाण करणार्‍या विमानांची सेवा बंद करण्याचे सांगितले आहे. एअर इंडियाने बुधवारी म्हणजे आज अमेरिकेला जाणारी काही उड्डाणे रद्द केली आहेत. एअर इंडियाच्या वतीने ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.

Air India
भारतात तिसरी लाट कधी येणार? आयआयटीच्या प्राध्यापकाने केले भाकित

अनेक उड्डाणे रद्द

ट्विटमध्ये एअर इंडियाने त्या विमानांचीही माहिती दिली आहे, जी अमेरिकेला जाणार होती आणि ती आता रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडियाने ट्विट करून लिहिले, 'अमेरिकेत 5G कम्युनिकेशन्स तैनात केल्यामुळे आम्ही 19 जानेवारीला काही उड्डाणे चालवणार नाही. AI101/102, DEL/JFK/ कंपनीने रद्द केलेल्या फ्लाइटची नावे आहेत. DEL, AI173/174, DEL/SFO/DEL, AI127/126, DEL/ORD/DEL, AI191/144, BOM/EWR/BOM.

आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या भारत आणि अमेरिकेदरम्यान फक्त एअर इंडियाची विमाने उड्डाण करत आहेत. पण आजपासून ते बदलेल. एअर इंडियाने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, 19 जानेवारी रोजी दिल्लीहून वॉशिंग्टनला जाणारे विमान AI103 आपल्या नियोजित वेळेवर निघेल. मात्र, इतर काही उड्डाणे प्रभावित होतील.

5G तंत्रज्ञान फ्लाइटला लँडिंग मोडमध्ये जाण्यापासून रोखू शकते

युएसमध्ये 5G कम्युनिकेशन तंत्रज्ञान लागू झाल्यामुळे 19 जानेवारीपासून एअरलाइनवर परिणाम होणार असून त्यात बदलही पाहायला मिळतील, असे एअरलाइनने म्हटले आहे. आजपासून अमेरिकेत संवादासाठी 5G तंत्रज्ञान सुरू होत आहे. याचा थेट परिणाम विमानांच्या येण्यावर होऊ शकतो. याचे वाईट परिणाम होऊ शकतात आणि 5G तंत्रज्ञान विमान कंपन्यांच्या कामात व्यत्यय आणू शकते, असे एअरलाइन उद्योगाचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com