K. S. Eshwarappa Dainik Gomantak
देश

बोम्मई सरकारला मोठा झटका, मंत्री केएस ईश्वरप्पा देणार राजीनामा

कंत्राटदाराच्या आत्महत्येवरुन वादात सापडलेले कर्नाटकचे मंत्री केएस ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) राजीनामा देणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमन्तक

कंत्राटदाराच्या आत्महत्येप्रकरणी वादात सापडलेले कर्नाटकचे मंत्री केएस ईश्वरप्पा राजीनामा देणार आहेत. ही माहिती देताना त्यांच्या सचिवाने सांगितले की, 'ईश्वरप्पा उद्या राजीनामा देणार आहेत.' विशेष म्हणजे बोम्मई सरकारचे (Bommai Government) ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) यांच्यावर संतोष पाटील या ठेकेदाराने ‘कमिशन’ मागितल्याचा आरोप केला होता. पाटील यांनी मंगळवारी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. संतोष पाटील यांचा मृतदेह एका खासगी लॉजच्या रुममध्ये आढळून आला. या कंत्राटदाराने व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) मेसेजमध्ये ईश्वरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करुन उडुपीमध्ये आत्महत्या केली होती. (Karnataka minister K. S. Eshwarappa to resign over controversy over contractor's suicide)

दरम्यान, या मेसेजमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला मंत्री ईश्वरप्पा जबाबदार असल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर काँग्रेस विरोधी पक्ष ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी करु लागले. स्वतःला भाजपचे (BJP) कार्यकर्ता म्हणवणाऱ्या पाटील यांनी 30 मार्च रोजी आरडीपीआर विभागात एक काम केले होते. त्यानंतर त्यांनी केलेल्या कामाची रक्कम मागितली. परंतु 4 कोटी रुपयांच्या कामासाठी ईश्वरप्पा यांनी 40 टक्के कमिशन पाटील यांच्याकडे मागितले होते.

तसेच, कंत्राटदाराने आपल्या सुसाईड नोटमध्ये ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी ईश्वरप्पा यांच्याविरुद्ध उडुपी पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 306 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या भावाने मंत्र्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. ईश्‍वरप्पा यांचे दोन सहकारी बसवराज आणि रमेश यांचीही एफआयआरमध्ये नावे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Lok Sabha Speech: काँग्रेसच्या काळातच 'नक्षलवाद' फोफावला! अमित शाह यांचं टीकास्त्र; इंदिरा गांधींपासून मनमोहन सिंगांपर्यंत वाचला चुकांचा पाढा

Horoscope April 2026: सुवर्णसंधी! ग्रहांच्या खेळात मिथुन राशी ठरणार 'किंग'; 2 एप्रिलनंतर भाग्याची मिळणार साथ अन् श्रीमंतीचं स्वप्न होणार पूर्ण

KitKat Chocolate Theft: चोरट्यांना 'किटकॅट'ची चटक! 12 टन पळवले चॉकलेट, नेस्ले प्रवक्त्याच्या 'त्या' विधानाची होतेय चर्चा

PSL Controversy: चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात कैद झाला 'हा' खेळाडू; आता थेट हकालपट्टीची टांगती तलवार Watch Video

Goa Accident: थिवीमध्ये भीषण अपघात! कारनं दोन दुचाकींना उडवलं, एकाचा मृत्यू; चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT