Former Chief Minister Siddaramaiah Dainik Gomantak
देश

कर्नाटकात पुन्हा 'ऑपरेशन लोटस'ची तयारी? सीएम सिद्धरामय्या म्हणाले- यावेळी मात्र...

Karnataka Politics: भाजपचे नेते त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होणार नाहीत कारण काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही.

Manish Jadhav

Karnataka Chief Minister Siddaramaiah's statement: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपवर मोठा आरोप करत राज्यात ‘ऑपरेशन लोटस’ची तयारी सुरु असल्याचे सांगितले.

असा आरोप करत त्यांनी शनिवारी सांगितले की, 'भाजपचे नेते त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होणार नाहीत कारण काँग्रेसचा एकही आमदार फुटणार नाही.'

2019 मध्ये काँग्रेस-जनता दल (धर्मनिरपेक्ष) युतीचे सरकार पाडण्यात गुंतलेली एक टीम आता पक्षांतरासाठी काँग्रेस (Congress) आमदारांना 50 कोटीची ऑफर देऊ करत असल्याच्या पक्षाचे मंड्याचे आमदार रविकुमार गौडा यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या प्रतिक्रिया देत होते. ते मंत्रीपदाचे आमिष दाखवत असून चार आमदारांशी त्यांचा यापूर्वीच संपर्क झाला आहे. मात्र लवकरच यासंबंधी पुरावे देण्यात येतील, असेही सिद्धरामय्या म्हणाले.

'ऑपरेशन लोटस' वर सिद्धरामय्या म्हणाले...

दरम्यान, आमदाराच्या वक्तव्याशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना सिद्धरामय्या म्हणाले की, "मी हे वक्तव्य करणाऱ्या रवी (रवि कुमार गौडा) यांच्याशी बोललो नाही, परंतु माझ्याकडे अशी माहिती आहे की भाजप राज्यातील कॉंग्रेस शासित सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. ते 'ऑपरेशन लोटस' राबवण्याच्या प्रयत्नात आहेत.''

मोठे षडयंत्र रचले जात आहेः शिवकुमार

गौडा यांच्या वक्तव्यावर आपल्या प्रतिक्रियेत उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, "एक मोठे षडयंत्र रचले जात आहे, पण ते यशस्वी होणार नाहीत. आम्हाला आमच्या आमदारांवर पूर्ण विश्वास आहे. गौडा यांनी एका तरुणाचे नाव घेतले आहे.''

अलिकडेच, शिवकुमार यांनी स्वतः भाजपवर (BJP) आरोप केला होता की, 'भाजपची एक टीम राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस आमदारांनी त्यांना आणि सिद्धरामय्या यांना याबद्दल सांगितले आहे.'

ऑपरेशन लोटस म्हणजे काय?

'ऑपरेशन लोटस' हा शब्द 2008 मध्ये पहिल्यांदा चर्चेत आला, जेव्हा कर्नाटकचे माजी राज्यमंत्री जी. जनार्दन रेड्डी यांनी पक्षांतरविरोधी कायद्याला बगल देऊन आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी खास रणनिती आखली. या रणनितीलाच ऑपरेशन कमल किंवा ऑपरेशन लोटस असे नाव देण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT