CM Siddaramaiah with DK Shivakumar as his Deputy, took oath in Bengaluru Dainik Gomantak
देश

'मी शपथ घेतो की...', सिद्धरामय्या मुख्यमंत्री, तर डीके शिवकुमार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

आम्ही तुम्हाला स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ - राहुल गांधी

Pramod Yadav

Karnataka CM: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची तर, कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि अनेक विरोधी पक्षांचे नेते शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

(CM Siddaramaiah with DK Shivakumar as his Deputy, took oath in Bengaluru today)

कर्नाटक सरकारच्या शपथविधी सोहळ्यात विरोधी पक्षांनी आपली एकजूट दाखवली. या सोहळ्यात नितीश कुमार, एमके स्टॅलिन, तेजस्वी यादव, मेहबुबा मुफ्ती मंचावर पोहोचले. तिथे मंचावर कमल हसन, सीताराम येचुरी, फारुख अब्दुल्ला, डी राजा, दीपंकर भट्टाचार्य, सीएम अशोक गेहलोत, भूपेश बघेल, सुखविंदर सिंग सुखू उपस्थित होते.

"कर्नाटकातील जनतेने द्वेषाचा पराभव केला. कर्नाटकाने द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडले आहे. आम्ही खोटी आश्वासने देत नाही, काँग्रेसने दिलेली 5 आश्वासने कर्नाटक सरकारच्या काही तासांत होणाऱ्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत मान्य केली जातील. आम्ही तुम्हाला स्वच्छ, भ्रष्टाचारमुक्त सरकार देऊ." असे राहुल गांधी म्हणाले.

काय आहेत काँग्रेसची पाच आश्वासने

1. 200 युनिटपर्यंत मोफत वीज

2. गरीब कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा 2 हजार

3. महिलांसाठी मोफत सार्वजनिक वाहतूक

4. दोन वर्षांसाठी बेरोजगारांसाठी भत्ता – पदवीधरांसाठी तीन हजार, डिप्लोमासाठी दीड हजार

5. बीपीएल कुटुंबांना दहा किलो मोफत तांदूळ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT