तुमच्या खोक्यात 2,000 च्या नोटा आहेत का चेक करा; पणजीकरांनी बंडखोर आमदारांवर साधला निशाना

गोवा काँग्रेसचे नेते अमरनाथ पणजीकर यांनी पक्षांतर केलेल्या बंडखोर आमदारांवर निशाना साधला आहे.
Amarnath Panjikar
Amarnath PanjikarDainik Gomantak

Amarnath Panjikar: मागील वर्षी गोव्यातील आठ काँग्रेस आमदरांनी बंडखोरी करत सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश केला. या आमदारांनी पैसे घेऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आरोप त्यावेळी काँग्रसने केला होता. दरम्यान, शुक्रवारी रात्री आरबीआयने दोन हजार रूपयांच्या नोटा मागे घेणार असल्याचे सांगत, यापुढे त्यांची छापाई होणार नसल्याचेही स्पष्ट केले. यावरून गोवा काँग्रेसचे नेते अमरनाथ पणजीकर यांनी पक्षांतर केलेल्या बंडखोर आमदारांवर निशाना साधला आहे.

दोन हजारांच्या नोटा वितरणातून बाहेर काढल्या जाणार असून, लवकरच त्या बंद होणार आहेत. अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. याचा संदर्भ देत गोवा काँग्रेसचे नेते अमरनाथ पणजीकर यांनी भाजपमध्ये गेलेल्या काँग्रेस आमदारांवर खोचक टीका केली आहे.

"भाजपमध्ये गेलेल्या आमदारांनो तुमच्या खोक्यात दोन हजारांच्या नोटा आहेत का चेक करा, नाहीतर काहीच ओके नाही!" अशा शब्दात पणजीकरांना पक्षांतर केलेल्या आमदारांवर टीका केली आहे.

Amarnath Panjikar
पुन्हा नोटाबंदी! RBI 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पणजीकर यांची खोचक शब्दातील ही टीका चांगलीच व्हायरल होत असून, त्यावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत.

गेल्या वर्षी गोवा विधानसभेचे पहिले अधिवेशन झाल्यानंतर आठ काँग्रेस आमदरांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे काँग्रेसकडे 11 आमदारांपैकी आता केवळ तीन आमदार शिल्लक आहेत. पक्षांतर केलेल्या आमदारांमध्ये माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकल लोबो यांच्यासह मोठे आमदार असल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला होता.

दरम्यान, या पक्षांतरासाठी भाजपने आमदारांना पैशांचे आमिष दिल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. लाखो रूपये काँग्रेस आमदरांनी पक्षांतरासाठी घेतले असा आरोप झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com