Karnataka Road Accident 4 Dead 14 Injured: कर्नाटकातून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली. हुंसूर जवळील पेरियपट्टना भागात एक भरधाव खाजगी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या भयंकर अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, 14 अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही कावेरी एसी स्लीपर बस केरळमधील कोझिकोड येथून बंगळुरुच्या दिशेने येत होती. या जोरदार धडकेमुळे बस आणि ट्रक या दोन्ही वाहनांचे पुढचे भाग पूर्णपणे चक्काचूर झाले. अपघाताचा आवाज इतका जोरदार होता की, परिसरातील नागरिक तातडीने मदतीसाठी धावले.
त्याचवेळी, पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने बचावकार्य सुरु केले आणि सर्व जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातात गमावलेल्या व्यक्तींपैकी आफतब, साजेश (वय 36) आणि सुनील अशी तीन मृतांची ओळख पटली असून ते सर्व मनकावु येथील रहिवासी आहेत. तर चौथ्या मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. सर्व मृतदेह हुंसूर येथील शासकीय रुग्णालयाच्या शवागारात पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, हा अपघात नेमका कसा घडला आणि यामध्ये कोणाची चूक होती, याचा कसून तपास केला जात आहे.
अलीकडेच हुबळी येथेही भीषण अपघात (Accident) घडला. मुंबईहून बंगळुरुपर्यंत जाणारी एक खाजगी बस अनियंत्रित होऊन थेट रस्त्याशेजारील शेतात जाऊन पलटी झाली. या दुर्देवी घटनेत अवघ्या आठ वर्षांच्या एका चिमुकल्या मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर बसमधील चालक आणि 16 प्रवाशांसह एकूण लोक जखमी झाले. पहाटेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात बसचा वेग जास्त असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
अपघातानंतर बसचा चालक आतमध्येच अडकून पडला, ज्याला पोलिसांनी आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन बाहेर काढले. एकापाठोपाठ घडलेल्या या दोन प्रमुख अपघातांमुळे कर्नाटकच्या रस्ते सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.