Karnataka Politics Muslims  Dainik Gomantak
देश

Karnataka Politics: 'चुकूनही मुस्लिम नेत्यांना मत देऊ नका', भाजप आमदाराचे वक्तव्य

BJP MLA Basangowda Patil Yatnal: विजयपुरा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना बसनागौडा पाटील यत्नल यांनी मुस्लिमांची तुलना टिपू सुलतानशी केली.

Manish Jadhav

Karnataka Assembly Elections: कर्नाटकात विधानसभा निवडणुकीपूर्वी टिपू सुलतानच्या वादात भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांच्या वक्तव्याने नवा वाद सुरु झाला आहे.

विजयपुरा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना बसनागौडा पाटील यत्नल यांनी मुस्लिमांची तुलना टिपू सुलतानशी केली.

एवढेच नाही तर बसनागौडा यांनी लोकांना मुस्लिम नेत्यांना मत देऊ नका असे सांगितले. बसनगौडा पाटील म्हणाले की, आमदार मला विचारतात की तुमच्या मतदारसंघात एक लाख टिपू सुलतान आहेत, मग विजापूरमधून शिवाजी महाराजांचे वंशज कसे जिंकले?

भाजपचे आमदार पाटील म्हणाले की, "सर्व आमदार मला विचारतात की आपल्या क्षेत्रात एक लाखपेक्षा जास्त टिपू सुलतान (मुस्लिम मते) आहेत.

तर शिवाजी महाराजांचा वंशज बिजापूरमधून तुम्ही कसे जिंकता? टिपू सुलतानचे वंशज बिजापूरमध्ये कधीही जिंकू शकत नाहीत. लक्षात ठेवा, आपल्याला मुस्लिमांना (Muslim) मतदान करण्याची गरज नाही.''

कर्नाटकातही राजकीय पक्षांसाठी मुस्लिम मतदान किती महत्त्वाचे आहे?

कर्नाटकातील (Karnataka) सुमारे 13 टक्के मुस्लिम आहेत. विधानसभेच्या 20 ते 23 जागांमध्ये मुस्लिम मते खूप महत्वाची आहेत. त्याचवेळी, 60 विधानसभा जागांवर मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे. सध्या विधानसभेत फक्त 7 मुस्लिम आमदार आहेत आणि सर्व कॉंग्रेसचे आहेत.

कर्नाटकात मुस्लिम मते

मुस्लिम लोकसंख्या सुमारे 13 टक्के आहे

20 ते 23 जागांमध्ये मुस्लिम मते महत्त्वपूर्ण आहेत.

60 जागांवर मुस्लिम मतांचा प्रभाव.

विधानसभेत केवळ 7 मुस्लिम आमदार.

'टिपू सुलतानच्या चाहत्यांनी जिवंत राहू नये'

पूर्वी कर्नाटक भाजपचे अध्यक्ष नलिन कुमार काटिल यांनीही टिपू सुलतानबद्दल असेच वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, 'टिपू सुलतानच्या चाहत्यांनी जिवंत राहू नये.' इतकेच नव्हे तर ते टिपू सुलतानच्या वंशजांना जंगलात पाठविण्याविषयी बोलले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT Project Farmagudi: फर्मागुढी 'आयआयटी'ला विरोधासाठी विरोध नको! देवस्थानला धक्का लागणार नाही;CM प्रमोद सावंताचे स्पष्टीकरण

Goa Politics: राजकारणात खळबळ! सासष्टीतील मतं फोडण्यासाठी भाजपकडून 100 कोटींची तरतूद; गिरीश चोडणकरांचा गंभीर आरोप

Horoscope: महिन्याच्या शेवटच्या दिवशी 'या' 4 राशींचे नशीब चमकणार; करिअर, व्यवसायात मोठ्या यशाचे संकेत

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

SCROLL FOR NEXT