Maharashtra-Karnataka Border Dispute: शिंदे-बोम्मई यांच्यात अहमदाबादेत चर्चा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात काल अहमदाबाद विमानतळावर भेट झाली.
Eknath shinde and Basavraj Bommai
Eknath shinde and Basavraj BommaiDainik Gomantak

Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात काल अहमदाबाद विमानतळावर भेट झाली. या भेटीत दोघांच्यात सीमा वादावर चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सध्या सुरू असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर आज पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस आणि बोम्मई यांची भेट झाली आहे. गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या शपथविधी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते.

शपथविधीनंतर परत जात असताना शिंदे, फडणवीस आणि बोम्मई यांची विमानतळाच्या विशेष कक्षात भेट झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरुन राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे.

Eknath shinde and Basavraj Bommai
Belgaum: बेनकनहळ्ळीत शेतजमिनीच्या वादातून तुफान मारहाण

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील अनेक गावांवर दावा केल्याने राजकीय वातावरण तापले होते. सीमावादाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट असून सर्वोच्च न्यायालयात याबाबत सुनावणी सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com