Donkey Milk Farm in Mangaluru Twitter / @ANI
देश

Donkey Milk Business: गाढवीणीचे दूध विकून आयटी इंजिनिअर झाला 'लखपती'

कर्नाटकातील मंगळुरुमध्ये एका व्यक्तीने मिल्क फार्म उघडण्यासाठी आपली आयटी नोकरी सोडली आहे.

दैनिक गोमन्तक

Donkey Milk Farm in Mangaluru: कर्नाटकातील मंगळुरुमध्ये एका व्यक्तीने मिल्क फार्म उघडण्यासाठी आपली आयटी नोकरी सोडली आहे. श्रीनिवास गौडा असे या व्यक्तीचे नाव असून तो 2020 पर्यंत एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होते. श्रीनिवास यांच्या मते, कर्नाटकातील हे पहिले गाढव पालन आणि प्रशिक्षण केंद्र आहे. (karnataka a man quits his it job to open a donkey milk farm in mangaluru)

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना श्रीनिवास गौडा म्हणाले, "मी 2020 पर्यंत सॉफ्टवेअर फर्ममध्ये काम करत होतो. कर्नाटकातील (Karnataka) हे पहिले गाढव पालन आणि प्रशिक्षण केंद्र आहे." गाढवीणीच्या दुधाचे फायदे आणि फार्मसाठीच्या आपल्या योजनेबद्दल बोलताना श्रीनिवास म्हणाले की, 'सध्या आमच्याकडे 20 गाढवे आहेत आणि मी सुमारे 42 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.'

ते पुढे म्हणाले की, 'आम्ही गाढवीणीचे दूध विकण्याचा विचार करत आहोत, ज्याचे अनेक फायदे आहेत. गाढवीणीचे दूध (Milk) सर्वांना मिळावे, हे आमचे स्वप्न आहे.' गाढवीणीचे दूध पोषक आहे. श्रीनिवास गौडा यांनी सांगितले की, 'गाढवांच्या प्रजाती कमी झाल्यामुळे मला ही कल्पना आली.'

अहवालानुसार, दूध पॅकेटमध्ये उपलब्ध असेल आणि 30 मिली दुधाच्या पॅकेटची किंमत 150 रुपये असेल. गौडा पुढे म्हणाले की, 'दुधाचे पॅकेट मॉल्स, दुकाने आणि सुपरमार्केटमध्ये उपलब्ध असतील.' 17 लाख रुपयांच्या ऑर्डर्स मिळाल्या असल्याचा दावाही त्यांनी केला.

श्रीनिवास गौडा पुढे म्हणाले की, गाढवीणीच्या दुधाला प्रतिलिटर 5,000 ते 7,000 रुपये मिळतात. गाढवाच्या मूत्राला प्रतिलिटर 500 ते 600 रुपये मिळतात. रामनगर जिल्ह्यातील कनकपुरा येथील शेतकरी (Farmers) कुटुंबातील श्रीनिवास यांचे कृषी क्षेत्रासाठी काहीतरी देण्याचे स्वप्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 75 वर्षांच्या आजीबाईचा डान्स फ्लोअरवर तहलका, सोशल मीडियावर जबरदस्त डान्स व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "वाह आजी क्या बात है!"

WPL Auction 2026: वर्ल्ड कपमध्ये 2 शतके, 299 धावा! विश्वविक्रमी कामगिरी करुनही ऑस्ट्रेलियाची 'ही' स्टार खेळाडू राहिली 'अनसोल्ड'

ZP निवडणूक वेळेवरच! आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या

Goa Politics: आरजी-काँग्रेसचे विचार वेगळे! आमदार व्हेन्झींची युतीवर टीका; म्हणाले, "भाजपला हरवण्यासाठी 'स्वच्छ' नेतृत्वाची गरज"

Mangal Gochar 2026: 16 जानेवारीला मंगळ ग्रहाचे पहिले गोचर! 'या' 3 राशींच्या लोकांवर होणार धनवर्षा; आरोग्य, प्रेम आणि व्यवसायातही मिळणार यश

SCROLL FOR NEXT