कर्नाटकचे वरिष्ठ आयपीएस पी. रवींद्रनाथ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. (IPS officer from Karnataka resigns due to continuous transfers)
राजीनामा पत्रात देखील त्यांनी याबाबत लिहिले आहे. याचबरोबर बनावट जात प्रमाणपत्रे तयार करणाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे त्यांना त्रास दिला देत असल्याचा आरोप राजीनामा पत्रात केला आहे. या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचा राजीनामा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
संपूर्ण प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकचे वरिष्ठ आयपीएस पी रवींद्रनाथ यांची वारंवार बदली केली जात होती. यामुळे व्यथित होऊन त्यांनी मंगळवारी (10 मे) आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजीनामा पत्रात लिहिले की, 'कोणतेही कारण नसताना माझी वारंवार बदली करण्यात आली. हा केवळ माझा छळ करण्याचा मार्ग होता, कारण मी बनावट जात प्रमाणपत्रे तयार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली होती. यासाठी मला हे बक्षीस मिळाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.